पौड, ता. ८ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मुळशी तालुक्यात १ लाख १० हजार ८६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे यावेळी पुरुषांपेक्षा महिलांचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे. अंबडवेट गणात सर्वाधिक ७२.४८ तर हिंजवडी सर्वांत कमी ५२.७३ टक्के मतदान झाले. तथापि यावेळी मतदारांवारांवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींसह, शिवसेना, भाजपसाठी झालेल्या अस्तित्वाच्या लढाईत विजयाची पताका कुणाच्या हातात जाणारा याचा फैसला सोमवारी (ता. ९) होणार आहे.
तालुक्यात तीन गट आणि सहा गणांत ९५९१३ पुरुष, ७७४८३ महिला आणि ५ तृतीयपंथी असे एकूण १७३४०१ मतदार होते. त्यापैकी ६०७५९ पुरुष आणि ५०१०२ महिला अशा एकूण ११०८६१ मतदारांनी मतदान केले. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६३.३४ होती महिलांची मतदानाची टक्केवारी ६४.६६ होती. पौड गणात २५१३८ (१२१५४ महिला आणि १३१६४ पुरुष) मतदार होते. त्यापैकी ८३५५ महिला आणि ९७२२ पुरुष अशा एकूण १८०७७ मतदारांनी मतदान केले. या गणात ७१.४० टक्के मतदान झाले. अंबडवेट गणात २२५०८ (१०८५९ महिला आणि ११६४९ पुरुष) मतदार होते. त्यापैकी ७५०६ महिला आणि ८८०७ पुरुष असे एकूण १६३१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या गणात ७२.४८ टक्के मतदान झाले. पौड - अंबडवेट जिल्हा परिषद गटात १५८६१ महिला आणि १८५२९ पुरुष असे एकूण ३४३९० मतदान झाले.
माण गणात २८६३५ (१३१६३ महिला आणि १५४७०) मतदार होते. त्यापैकी ८७६७ महिला आणि १०१३९ पुरुष असे एकूण १८९०६ मतदान झाले. या गणात ६६.०२ टक्के मतदान झाले. तर हिंजवडी गणात ४७०१५ (१८५१९ महिला आणि २८४९४ पुरुष) मतदार होते. त्यापैकी १०४८३ महिला आणि १४३०८ पुरुष अशा एकूण २४७९१ मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. या गणात ५२.७३ टक्के मतदान झाले. माण - हिंजवडी गटात १९२५० महिला आणि २४४४७ पुरुष अशा एकूण ४३६९७ मतदारांनी मतदान केले. पिरंगुट गणात २०७९५ (९१४६ महिला आणि ११६४८ पुरुष) मतदार होते. त्यापैकी ६०७४ महिला आणि ७१८६ पुरुष अशा एकूण १३२६० मतदारांनी मतदान केले. या गणात ६३.७७ टक्के मतदान झाले. तर भूगाव गणात २९१३० (१३६४२ महिला आणि १५४८८ पुरुष) मतदार होते. त्यापैकी ८९१७ महिला आणि १०५९७ पुरुष अशा एकूण १९५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या गणात ६६.९९ टक्के मतदान झाले. पिरंगुट- भूगाव गटात १४९९१ महिला आणि १७७८३ पुरुष अशा एकूण ३२७७४ मतदारांनी मतदान केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.