पुणे

राहू बेटपरिसरातील शेतकरी चिंतातूर

CD

राहू, ता. १३ : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात आणि राहू बेटपरिसरामध्ये बाजरी पेरणीच्या वेळी पुरेसा समाधानकारकरित्या पाऊस पडला नव्हता. त्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांनी बाजरीच्या पेरण्या केल्या. मात्र, सध्या पावसाअभावी बाजरीच्या पिकांमध्ये उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

जून व जुलै महिन्यात बाजरीची पेरणी केली जाते. सध्या कणसांमध्ये सध्या भरण्यास सुरुवात झाली असून, पीक फुलोऱ्यात आहे. पाखरांपासून बचाव होण्यासाठी बाजरी पिकाच्या चारही बाजूंनी विविध रंगबेरंगी प्लॅस्टिकचे थर-थर आवाज करणारे प्लॅस्टिकचे कागद तसेच पुरुषांची प्रतिकृती (बूजगावणी) लावण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बाजरीच्या काढणीला सुरुवात होईल. एक एकर क्षेत्रांमध्ये सरासरी सोळा ते अठरा पोती म्हणजे म्हणजे दोन टनांपर्यंत बाजरीचे उत्पादन मिळेल, असा अंदाज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दौंड तालुक्‍यात तीन हजार ६५७ हेक्‍टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांना खात्रीशीर व गुणवत्तेचे दर्जेदार बियाणे मिळाले आहे. पिकाला हवामान पोषक आहे. विविध पिकांच्या बियाण्यांबाबत कृषी विभाग सतर्क आहे.
- अजिंक्य दुधाणे, दौंड तालुका कृषी अधिकारी

अवकाळी पाऊस मे महिन्यात अतिरिक्त झाला. मात्र, बाजरी पेरणीच्या वेळेस पावसाने दांडी मारल्याने बागायती पट्ट्यात बाजरीची पिके बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यामुळे बाजरीला बाजारभाव चांगला मिळणार आहे.
- संजय थोरात, बाजरी उत्पादक शेतकरी वाळकी (ता.दौंड)

03165

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : पोलिसांनी चौकशीचा फास आवळताच निलेश घायवळचे कुटुंब गायब; पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्याचेही कारनामे उघड

काय आहे भारतात आलेलं YouTube Premium Lite? फक्त 89 रुपयांत इतके सारे भन्नाट फायदे; व्हिडिओ बघण्याची मजा होणार डबल

ती मुलगी काहीच... आमिर खानच्या मुलीशी लग्न करतोय असं सांगितल्यावर काय म्हणालेली नुपूर शिखरेची आई?

Tejaswini Lonari : तेजस्विनी लोणारीला आवडते जपानी सुशी आणि चटणी सँडविच; जाणून घ्या तिचा खास फूड फंडा!

Ravan Temples In India: रावणाची 'ही' 5 मंदिर तुम्हाला माहितीय का? जिथे लंकेच्या राजाची होते पूजा

SCROLL FOR NEXT