पुणे

अखेर वडगाव बांडे येथील शाळेत शिक्षक रुजू

CD

सकाळ इम्पॅक्ट

राहू, ता. २४ : वडगाव बांडे (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील दोन शिक्षकांची बदली होऊन शाळेत शिक्षक रुजू न झाल्यामुळे ग्रामस्थ व पालक संतप्त झाले होते. यामुळे बुधवार (ता. १९) ते शनिवार (ता. २२) चार दिवस चाललेल्या आंदोलनात शाळेच्या प्रवेशद्वारावर टाळे ठोकणे, बोंबाबोंब आंदोलन, अर्ध नग्न आंदोलन, गावातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन आंदोलन केल्यानंतर अखेर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला जाग आली.

अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शनिवारी (ता. २२) संबंधित दोन्ही शिक्षकांना शेलार मेमाणवाडी (ता. दौंड) येथून कार्यमुक्त करून (ता. २४) नोव्हेंबरपासून वडगाव बांडे (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत रुजू होण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (पत्रव्यवहार) सूचना केल्या. संबंधित शिक्षक शाळेत रुजू झाल्यानंतर वडगाव बांडे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.

वडगाव बांडे केंद्र शाळेमध्ये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक ही दोन्ही पदे रिक्त आहे. ‘‘सुमारे २२० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अतिरिक्त तासिका घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. विद्यार्थ्यांची कोणतेही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न केला जाईल,’’ असे येथील नवीन रुजू झालेले शिक्षक अमर खेडेकर, धनश्री पासलकर यांनी सांगितले.

‘सकाळ’च्या सडेतोड बातम्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वडगाव बांडे येथे ग्रामस्थांच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनाला ‘सकाळ माध्यम समूहा’ने सडेतोड निर्भीड असे वृत्तांकन दिल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाचे स्थानिक ते वरिष्ठ अधिकारी खळबळून जागे झाले. शाळेत शिक्षक रुजू झाले आहेत. ‘सकाळ’चे खूप आभार.
- सुभाष कुलाळ (सरपंच), जयवंतराव गरदरे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Controversy : टी-२० वर्ल्डकपच्या वादात आता शाहीद आफ्रिदीची उडी; ICC वर केले गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाला?

Nashik Crime : खळबळजनक! ४०० कोटींच्या कंटेनर लुटीप्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी; 'एसआयटी'चा वेगाने तपास

Nagpur News: दहावीच्‍या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं; भावाने खोलीचे दार उघडलं धक्काच बसला, आईने फोडला हंबरडा!

Latest Marathi news Live Update: तुळजापुरात सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Government Jobs: भारत सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी! या लोकांना मिळणार चान्स, अर्ज करा लगेच!

SCROLL FOR NEXT