राहू, ता. २६ : वडगाव बांडे (ता. दौंड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भरत मेमाणे यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल गोटखिंडे, सचिव संपत गरदरे यांनी दिली.
माजी अध्यक्ष रंगनाथ बांडे, उपाध्यक्ष आनंदा गरदरे यांनी ठरलेल्या मुदतीत पदांचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी सरपंच सुभाष कुलाळ, जयवंतराव गरदरे, तानाजी मेमाणे, बी. बी. गरदरे, शहाजी टुले, रामदास सोनलकर, माऊली यादव, माणिकराव पिंगळे, वसंत खुंटे, शिवाजी गरदरे, नवनाथ गरदरे, संजय जाधव, गौतम सोनवणे, चंद्रशेखर सटाले, नीलेश जाधव, सविता मोरे, हौसाबाई कुलाळ आदी उपस्थित होते.