राजगुरुनगर, ता. ४ : राजगुरुनगर (ता. खेड) येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी (ता. ३) रात्री आणण्यात आला. त्यानंतर अनेक गावांमध्ये तो फिरविण्यात आला. मोठ्या संख्येने लोकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश राजगुरुनगरमध्ये प्रथम माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. तेथे अस्थिकलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. मोहिते व त्यांच्या पत्नी सुरेखा मोहिते यांनी पूजन करून अभिवादन केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, नीलेश थिगळे, अनिकेत खालकर, विशाल तुळवे, जगन्नाथ राक्षे, शंकर देवदरे, अरुण मुळूक, संदेश पाचारणे, वैभव नाईकरे आदी उपस्थित होते.
त्यानंतर अस्थिकलश पंचायत समिती चौकात आर्यन कॅपिटल इमारतीसमोर दर्शनासाठी ठेवण्यात आला. भावपूर्ण वातावरणात अनेकांनी कलशाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख अनिल राक्षे, अजय चव्हाण, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक अविनाश कहाणे, ज्ञानेश्वर करंडे आदी उपस्थित होते.
यावेळी अजितदादा अमर रहे, अशा घोषणा देत शोकाकूल कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचा रथ मार्गस्थ केला. तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये अस्थिकलश रथ फिरविण्यात आला. ठिकठिकाणी लोकांनी श्रद्धापूर्वक त्याचे दर्शन घेतले.
04231
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.