पुणे

रांजणगाव सांडस येथील शाळेत सायकलींचे वाटप

CD

रांजणगाव सांडस, ता. २३ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे पुणे जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतचे पदाधिकारी व दानशूरांकडून मिळालेल्या सायकलींचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण १५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या आवाहनाला रांजणगाव सांडस गावातील दानशूरांनी प्रतिसाद देत १५ सायकली जमा केल्या व त्याचे वाटप केले. मंत्रालयातील कक्ष अधिकारी सचिन काळभोर, सरपंच प्रदीपा संभाजी रणदिवे, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक जीवन तांबे, माजी सरपंच उत्तम लोखंडे, उपसरपंच प्रवीण रणदिवे, प्रवीण निंबाळकर, राजाराम सोपान रणदिवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मालू शिंदे, सुनील लक्ष्मण रणदिवे, दत्तात्रेय राजाराम असावले, रोहिदास वसंत रणदिवे, माया शंकर रणदिवे, पंकज हरिदास रणदिवे, सर्जेराव भोसले, भिऊ बाबूराव रणपिसे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सायकली घेऊन वाटप केले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्ष डुबे, मुख्याध्यापक हिरामण शेलार आदी उपस्थित होते. देवराम अलभर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर! दिवाळीनिमित्त शहरात विशेष पथके तैनात

Ready-To-Wear Sarees : दिवाळीसाठी साड्यांची मोठी मागणी! 'रेडी टू वेअर' साड्यांनी केली तरुणींची सोय

Latest Marathi News Live Update: अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसवर दगडफेक

Cyber Scam: गुंतवणुकीच्या आमिषाने साडेचार कोटींना गंडा; पुण्यातील तिघांची फसवणूक, तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल

Sangamner Accident: चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पुणे-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

SCROLL FOR NEXT