पुणे

इंदापूर बसस्थानकात महिलेचे दागिने चोरी

CD

इंदापूर, ता. १० : अकलूजवरून इंदापूरमार्गे पुण्याला निघालेल्या एका महिलेच्या पर्समधील तब्बल आठ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची व रोख रकमेची चोरी झाल्याची घटना आठ दिवसांपूर्वी इंदापूर येथील घडली.
अलका वसंत बनकर (वय ५९, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या २ मार्च रोजी आपले पती वसंतराव बनकर यांच्यासह अकलूजवरून इंदापूर येथे आल्या. इंदापूर येथून बस बदलून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण, मिनी गंठण, बांगड्या, नेकलेस, अंगठ्या, जुबे व कानातील सोन्याचे टॉप्स (किंमत ७ लाख ८० हजार रुपये व रोख रक्कम २४ हजार रुपये) असा एकूण ८ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. यावरून इंदापूर पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

Horoscope Astrology : 'या' 3 राशींचे लोक खूप वर्षे जगतात, उतार वयात मिळतं सगळं सुख..पाहा यात तुमची रास आहे का?

Lasalgaon News : कर्मवीर बंधारा तुटला, पूल व रस्ता वाहून गेल्याने गोळेगाव-गोंदेगाव वाहतूक ठप्प; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

NZ vs WI : वेस्ट इंडिजने ६.२ षटकांत १०६ धावा चोपल्या, पण विजयासाठी ४ चेंडूंत ७ धावा नाही करता आल्या; भन्नाट मॅचने जिंकली मनं...

SCROLL FOR NEXT