पुणे

युरोपातून मॉन्टेग्यू हॅरिअरचे शिर्सुफळ परिसरात आगमन

CD

समीर बनकर : सकाळ वृत्तसेवा
शिर्सुफळ : ता : ३० : दुर्मीळ आणि वेगवान शिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉन्टेग्यू हॅरिअर (निळसर भोवत्या) या पक्ष्यांचे बारामती परिसरातील शिर्सुफळ, पारवडी, गाडीखेल येथे आगमन झाले आहे. युरोप, पश्चिम आशिया तसेच सायबेरिया येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

मॉन्टेग्यूचा साधारणपणे १५ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील बारामती, सासवड, सोलापूर, इंदापूर, अहिल्यानगर या येथे मुक्कामी असतो. स्थानिक पक्षी निरीक्षकांनी मते मॉन्टेग्यू हा अतिशय वेगवान शिकारी पक्षी आहे. त्याचे आगमन हे परिसरातील पर्यावरणीय संतुलन व अधिवासाच्या आरोग्याचे संकेत आहे. घारीपेक्षा आकाराने लहान असणाऱ्या निळसर भोवत्या पक्ष्याचा अधिवास हा युरोप आणि आशियाच्या काही भागांत आढळत असतो.

मॉन्टेग्यूचा अधिवास
तसेच गवताळ प्रदेश
शेती परिसर
ओसाड मैदान
नदीकाठी

मुख्य अन्न
- छोटे कीटक
- किडे
- अंडी
- सरपटणारे प्राणी
- उंदीर


दृष्टिक्षेपात
१. खोकड आणि कोल्हा यांच्यापासून यांना धोका
२. रात्री मोठ्या संख्येने एकत्र येऊन जमिनीवर विसावा
३. प्रजननाच्या काळात नर आणि मादी दोघेही मिळून घरटे बांधतात
४. प्रजनन प्रक्रियेत आवाज काढणे किंवा पंख फडफडवणे अशा पद्धतीने दोघे एकमेकांशी संवाद
५. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान ५ ते ८ अंडी घालतात
६. पिल्लांना जन्म दिल्यानंतर नर आणि मादी दोघेही पिल्लांचा सांभाळ करतात.
७. भोवत्या पक्ष्यांमध्ये जनुकीय विविधता असल्याने यांच्यात वेगवेगळ्या प्रजाती आणि उपप्रजाती आढळून येतात.

इंग्रजी नाव : Montagu''s Harrier - मॉन्टेग्यू हॅरिअर
मराठी नाव: निळसर भोवत्या
वैज्ञानिक नाव: Circus pygargus.
आकार : लांबी ४३ ते ४७सेमी. पंखाचा विस्तार १०० ते ११५ सेमी.
वजन : नर साधारण २६५ ग्रॅम तर मादी ३८० ग्रॅम.


पक्षी निरीक्षण करताना बाळगा सावधगिरी
पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये, त्यांच्या नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप करू नये तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, पक्षी निरीक्षण करणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचे आवाहन बारामतीचे वनपाल संतोष उंडे यांनी केले आहे.


स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी, छायाचित्रकार, पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. बारामती परिसरातील नैसर्गिक पर्यटनालाही चालना मिळत असून मॉन्टेग्यू हॅरिअरचे आगमन हे बारामतीच्या जैवविविधतेत लक्षणीय भर घालत आहे.
- अश्विनी शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी, बारामती.

हिवाळ्यामध्ये सायबेरिया, मंगोलिया, चायना, रशिया, युरोपखंड या भागात प्रचंड थंडी पडून तेथील तापमान शून्य डिग्री सेल्सियसच्या खाली जाते. यामुळे तेथे अन्नाची उपलब्धता कमी होत नाही.

उत्तरेकडून दक्षिणेकडे उबदार तापमान असणाऱ्या भारत, दक्षिण आफ्रिका, आशिया खंडातील काही भागात ऑक्टोंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्थलांतरित करत असतात.
- विनोद बारटक्के, पक्षी निरीक्षक, पुणे

08712, 72306

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Sports Hub: मोठ्या क्रीडा स्पर्धा दिल्ली-मुंबईऐवजी अहमदाबादला का होतात? हे शहर क्रीडा केंद्र कसे बनले? जाणून घ्या कारण...

Talegaon Election : तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ५०० हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त!

Mohol Election : मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त तैनात; २५ जणांना केले तडीपार!

Baramati Election : माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; १८ जागांसाठी मतदान; २२ ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध!

Pune Education : सोशल हंड्रेड फाउंडेशनकडून शंभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; दोन हजार सभासदांनी उभा केला सामाजिक कृतज्ञता निधी!

SCROLL FOR NEXT