पुणे

‘कर्मयोगी’कडे साडेआठ कोटींची एफआरपी थकीत

CD

सोमेश्वरनगर, ता. २९ : साखर आयुक्तालयाने उसाची एफआरपी थकवलेल्या राज्यातील आठ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ‘कर्मयोगी’कडेही तब्बल ८ कोटी ५८ लाख रुपये एफआरपी थकीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत एफआरपीची थकबाकी अदा करणार असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.

साखर हंगाम (२०२४-२५) संपून तीन महिने आणि ऊस तुटून सहा महिने झाले तरीही राज्यातील आठ कारखान्यांकडे तब्बल ५८ कोटींची उसाची एफआरपी (रास्त व उचित दर) थकीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर्सकडे (मंगळवेढा) एक कोटी २७ लाख, माढ्यातील भैरवनाथ शुगरकडे दोन कोटी ९५ लाख, भीमा-टाकळीकडे एक कोटी २६ लाख थकबाकी आहे. अहिल्यानगरच्या केदारेश्वरकडे २५ कोटी, जालन्याच्या समृध्दी शुगर्सकडे १३ कोटी ६३ लाख, यवतमाळच्या डेक्कन शुगर्सकडे एक कोटी ११ लाख, बुलढाणाच्या पेनगंगा शुगरकडे दोन कोटी ७४ लाख थकबाकी आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यानेही सहा महिने ऊस बिले थकविली आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर लवकरात लवकर पैसे अदा करण्याचे आश्वासन कारखान्याने दिले होते. अखेर साखर आयुक्तालयाने आठ कोटी ५८ लाख रुपये थकीत एफआरपी व्याजासह न दिल्यास साखर, उपपदार्थ अथवा जमीन जप्त करून वसुली केली जाईल, असा नोटिशीद्वारे इशारा दिला आणि प्रशासन जागे झाले.
कर्मयोगीचे कार्यालयीन अधीक्षक शरद काळे व मुख्य लेखापाल विजय शिर्के यांनी येत्या दोन-तीन दिवसात २८०० रुपये प्रतिटनाप्रमाणे एफआरपीची थकबाकी अदा करत आहोत, असा निर्वाळा दिला आहे.

वीस कोटींच्या नोटीशीवरून संभ्रम
राज्य विक्रीकर विभागाचे उपायुक्त यांनी पुणे जिल्हा बँक व कर्मयोगी कारखान्यास थकीत करासंदर्भात नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र कर कायदा-२००२ नुसार कर्मयोगीकडे २० कोटी ४५ लाख रुपयांचा थकीत कर असून, कर्मयोगीसाठी देय असलेली कोणतीही रक्कम जिल्हा बँकेकडे असेल तर बँकेने कराची रक्कम त्वरित शासनास अदा करावी, असे नोटिशीत नमूद केले आहे.

थकबाकीबाबत अजून नोटीस आली नाही. मात्र, राज्यसरकारने सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणाऱ्या कारखान्यांना दहा वर्षे ऊस खरेदी कर माफ केला होता. त्याच माफ झालेल्या कराच्या वसुलीची नोटीस कधी कधी काढली जाते. मात्र, कराची जुनी रक्कम का मागितली गेली आणि कारखान्याकडून काही कागदपत्रांची पूर्तता राहिली आहे काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
- विजय शिर्के, ‘कर्मयोगी’चे मुख्य लेखापाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्समध्ये विक्री?

Eknath Shinde: राज्यात पूरस्थितीचे संकट मोठे, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Latest Marathi News Live Update: नालासोपारा पूर्वेमधील कपड्यांच्या दुकानाला लागली आग

TCS Layoffs: 'टीसीएस'मध्ये खरंच किती कर्मचाऱ्यांची कपात झाली? 12000 की 60000?

Ravindra Mangave : कारभारातील नाराजीमुळे अध्यक्ष ललित गांधींचा राजीनामा; रवींद्र माणगावे प्रभारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT