पुणे

परदेशी अभ्यासकांकडून ऊसशेतीचे कौतुक

CD

सोमेश्वरनगर, ता. २२ : होळ-सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील प्रगतशील शेतकरी विनायक पिसाळ यांनी ‘एआय’ आधारित ऊसशेती केली आहे. या प्रयोगाला परदेशी अभ्यासकांनी भेट देऊन कौतुक केले व एआयवरील आधारित शेतीचे तंत्र समजून घेतले

सदोबाचीवाडी येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक विनायक पिसाळ यांनी सोमेश्वर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हिएसआय) व कृषी विज्ञान केंद्र माळेगाव यांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरून ऊसशेती केली आहे. या शेतीला एका खासगी कंपनी व व्हीएसआयच्या पथकाने भेट देत कौतुक केले. चीनचे जॉन विबोवो, जर्मनीचे मरिअन माऊर्स व मार्कस फ्रेडे, तसेच आदित्य त्यागी, मिलिंद काटदरे, सुदर्शन कदम यांच्या एआय आधारित शेतीचे तंत्र समजून घेतले. पिसाळ यांनी अडीच एकर क्षेत्रात १ जुलै रोजी केलेली रोपपद्धतीची लागवड, ठिबक सिंचन याची माहिती परदेशी पाहुण्यांनी घेतली. जमिनीचे तापमान, हवेची आर्द्रता, हवामान अंदाज, पावसाचे प्रमाण, पानांची वाढ आदींचा सेन्सरच्या आधारे तयार केलेला महिनाभराचा तपशील पाहून पाहुण्यांनी शेतकऱ्याचे कौतुक केले.
एआयमुळे खत, पाणी याची बचत होते आणि कुठला रोग होऊ शकतो हे आधीच कळते अशी माहिती विवेक पिसाळ, अजित पिसाळ यांनी पाहुण्यांना दिली. याप्रसंगी सुरेश सूर्यवंशी, मकरंद सस्ते, जनार्दन सूर्यवंशी, तनिष्का पिसाळ, दत्तात्रेय गायकवाड, रमेश कारंडे, अथर्व कारंडे आदी शेतकरी उपस्थित होते.
04911

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New York पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा ताफा थांबवला; Donald Trump यांना फोन केला अन्..., काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: भाजप आणि काँग्रेस आक्रमक, एकमेकांविरोधात गुन्हा दाखल; साडी प्रकरणाने राजकीय वातावरण तापले

Sharad Pawar : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभा करा; बळीराजा वाचला नाही, तर राज्यावर मोठे संकट येईल

Latest Marathi News Live Update : खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर

Nitin Gadkari: शिक्षण देणे काळाची गरज, विद्यापीठांनी ज्ञानावर अधिक भर द्यावा, नितीन गडकरींचे आवाहन

SCROLL FOR NEXT