पुणे

सोमेश्वर कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी

CD

जिल्ह्यात बारामती ॲग्रोची गाळपात आघाडी

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. २२ : पुणे जिल्ह्यातील अठरा कारखान्यांपैकी घोडगंगा, राजगड आणि नेहमीप्रमाणे यशवंत हे तीन कारखाने चालू हंगामात बंद राहणार आहेत तर ‘अनुराज’चे धुराडे उशिरा पेटले आहे. दरम्यान अन्य चौदा कारखान्यांची धुराडी आता वेगाने धडधडत आहेत. उपलब्ध माहितीनुसार १६ लाख ५९ हजार टन ऊस गाळप झाले असून १२ लाख ६२ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. जिल्ह्यात गाळपात ‘बारामती अॅग्रो’ने तर साखर उताऱ्यात ‘सोमेश्वर’ने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.

जिल्ह्याचा चालू वर्षाचा गाळप हंगाम नेहमीपेक्षा वेगळा ठरला आहे. अठरापैकी यशवंत, घोडगंगा, राजगड हे तिन्ही ''सहकारी'' साखर कारखाने चालू वर्षीही बंद राहणार आहेत. अनुराज हा खासगी कारखाना ओंकार शुगर ग्रुपने घेतला असून त्याचा गव्हाणपूजन समारंभ ११ नोव्हेंबरला उशिरा झाला आहे. याशिवाय उर्वरीत चौदा कारखान्यांचे गाळप आता सुरळीत सुरू झाले आहे. सुरवातीला पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने गाळप मंदावले होते. साखर आयुक्तालयाच्या २० नोव्हेंबरच्या अहवालातील उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात १६ लाख ५९ हजार ८४४ टन गाळप झाले असून १२ लाख ६२ हजार ७५५ क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.

जिल्ह्याचा एकूण सरासरी उतारा ७.६१ टक्के आहे. त्यापैकी सहकारी कारखान्यांचा सरासरी उतारा ८.६७ टक्के तर खासगी कारखान्यांचा ६.५१ टक्के इतका आहे. सोमेश्वर आणि माळेगाव या दोन्ही कारखान्यांना दहा टक्क्यांपेक्षा अधिकचा उत्कृष्ट उतारा प्राप्त झाला आहे.


माळेगाव, भीमाशंकर आदींची ‘लाख’मोलाची कामगिरी
भीमाशंकर, विघ्नहर, छत्रपती या साखर कारखान्यांचा उताराही समाधानकारक आहे. तर ज्यूसपासून इथेनॉलनिर्मितीमुळे काही कारखान्यांचा उतारा कमी दिसत आहे. गाळपात बारामती अॅग्रो, दौंड शुगर या खासगी कारखान्यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर, छत्रपती, नीरा भीमा, विघ्नहर यांनीही ‘लाख’मोलाची कामगिरी केली आहे.


कारखाना गाळप (टन) साखर (क्विं.) उतारा (टक्के)
सोमेश्वर १६४०८२ १५८५५० १०.२५
माळेगाव १४४६३० १२९००० १०.२१
विघ्नहर १०८१७० ८१८०० ९.९६
भीमाशंकर १३०७८० १२०४०० ९.३०
छत्रपती १३५५३९ १२३३०० ९.००
संत तुकाराम ४८७२५ ३९८०० ८.०८
दौंड शुगर २५११९० १६७००० ७.१७
नीरा-भीमा ११३३३० ७९७७० ७.०७
बारामती अॅग्रो ४१९११८ २८८१५० ६.९०
श्रीनाथ ६०९४० ३१७१५ ५.३५
व्यंकटेशकृपा ८३३४० ४३२७० ५.१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT