पुणे

बाबुर्डी येथे कृषिदुतांचे स्वागत

CD

सुपे, ता. १० ः बाबुर्डी (ता. बारामती) गावात ग्रामिण कृषी कार्यानुभवासाठी आलेल्या बारामतीच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पुढील चार महिने गावात राहून हे विद्यार्थी कृषिदूत म्हणून विविध पिके व शेतीच्या प्रत्यक्ष अनुभवाची माहिती घेणार आहेत.
कृषी कार्यानुभव हा कृषी पदवी अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या अनुभवासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात गावकऱ्यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. हे विद्यार्थी ग्रामीण जीवन, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, शेती संबंधित समस्या जाणून घेणार आहेत. शेतात प्रत्यक्ष काम करून शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी शिक्षण आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधीचाही समावेश असतो, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
याप्रसंगी सूरज मुळे, विश्वविजय मिसाळ, ताहीर तांबोळी, शुभम धुमाळ, चैतन्य तुपे, अभय धुमाळ आदी कृषिदूत उपस्थित होते. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष सचिन लडकत, बाबुर्डी सोसायटीचे अध्यक्ष संतोष पोमणे, राजकुमार लव्हे, लक्ष्मण पोमणे, पुरुषोत्तम पोमणे, वसंत ढोपरे, धनंजय पोमणे, महेश ढोपरे, देवराज पोमणे, किशोर लव्हे, ऋषीकेश पोमणे आदी उपस्थित होते.

काळखैरेवाडीत एआय अॅपविषयी मार्गदर्शन
काळखैरेवाडीत कृषिदूत परिचय कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या इंद्रजित माळी, तुषार माळी, महारूद्र सुरवसे, सार्थक अंधारे, तेजस माळी, कल्पेश पाटील, युवराज सातपुते या कृषीदूतांचा पेरूचे रोप देऊन ग्रामस्थांनी सत्कार केला. या कृषिदूतांनी महाविस्तार एआय अॅपविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. याप्रसंगी कृषी सहायक अमोल लोणकर, ग्रामपंचायत अधिकारी रणजित ननावरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

02288

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Promise Day Horoscope: या राशींच्या लोकांनी प्रॉमिस डे ला 'ही' चूक करू नका; नाहीतर पार्टनर होईल नाराज, वाचा तुमचं राशीभविष्य

Honda Special Edition Scooter : होंडाने 'या' लोकप्रिय स्कूटरचे स्पेशल एडिशन केले लाँच; दमदार मायलेज, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT