पुणे

सुपे येथे ग्रामस्थांचे पाणावले डोळे

CD

सुपे, ता. ३ : सुपे (ता. बारामती) परिसरातील ग्रामस्थांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे मंगळवारी (ता. ३) दर्शन घेतले. अस्थिकलशाचे दर्शन घेताना अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.
येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील श्रीशहाजी व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात मंगळवारी (ता. ३) दुपारी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. येथील विद्यार्थ्यांनी अखेरचा दंडवत अशा शब्दांच्या आकारात बसून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी संभाजी होळकर, पुरुषोत्तम जगताप, सरपंच तुषार हिरवे, शंकरराव चांदगुडे, पोपटराव पानसरे, भरत खैरे, ज्ञानेश्वर कौले, अनिल जगताप, रतनसिंह खैरे, प्राचार्या एस. ए. लोणकर, दत्तात्रेय कुतवळ आदींसह सुपे व परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. सामुदायिक पसायदान घेण्यात आले.

02356

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

Man in burqa mumbai local Video : मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बुरखा घालून घुसला पुरूष अन् मग...

Solapur News : लग्नास नकारानंतर तरुणाने संपविले जीवन; मुलीला समोर बसून विचारण्याची केली होती विनवणी

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध संकटमोचक ठरलेल्या कर्णधार सू्र्यकुमारचा मोठा विक्रम; विराट कोहली, बाबर आझमला टाकलं मागे

SCROLL FOR NEXT