शिरूर, ता. १६ : ठिकठिकाणी डौलाने फडकणारे तिरंगी ध्वज... रंगरंगोटीसह रोषणाईने उजळून निघालेली शासकीय कार्यालये... शाळांबरोबरच शासकीय कार्यालयांतून घुमणारे राष्ट्रगीताचे सूर... शानदार पोलिस परेडला लाभलेली विद्यार्थ्यांच्या थरारक कवायतींची जोड... देशभक्तिपर गीतांच्या तालावर रंगलेल्या विद्यार्थ्यांच्या नृत्यनाटीका... अन कानाकोपऱ्यातून उमटत आसमंत दणाणून सोडणारा ‘भारत माता की जय’चा गजर... स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन शिरूर शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी साजरा झाला...
आमदार माऊली कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पोलिस परेड ग्राउंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीतासह जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे विद्याधामच्या कलामंचने सादरीकरण केले. न्यू इंग्लिश स्कूल व आयेशा बेगम उर्दू हायस्कूलच्या कलामंचातील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने शानदार संचलन करीत तिरंगी झेंड्याला मानवंदना दिली. डॉ. वसंत पानसरे, नामदेवराव घावटे, जाकिरखान पठाण, सुनील जाधव, शोभना पाचंगे पाटील, शरद कालेवार, नितीन पाचर्णे, संजय देशमुख, मुजफ्फर कुरेशी, नीलेश जाधव, सुजाता पाटील, भाजप महिला प्रिया बिरादार, विनोद भालेराव, अविनाश मल्लाव, एजाज बागवान, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, सविता बोरुडे, शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, अशोक पवार, आबिद शेख व नीलेश लटांबळे, युवा नेते सागर नरवडे, प्रीती बनसोडे, धन्यकुमार मुथा, सुदाम चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. सचिन रासकर यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी आभार मानले.
पंचायत समितीत गटविकास अधिकारी महेश डोके, तर नगर परिषद कार्यालयासमोर मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सफाई कामगारांचा सन्मान केला. येथील हुतात्मा स्तंभावर किसनराव जाधव यांनी ध्वजवंदन केले. ऑपरेशन सिंदूर मधील सहभागी जवान राजेश गोपाळ यांच्या हस्ते कुंभार आळीत ध्वजवंदन झाले. कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार यांनी त्यांचा सन्मान केला. लाटेआळीत माजी सैनिक विनायक कळमकर, शिरूर बाजार समितीत माजी सैनिक बबनराव पवार यांनी तर हलवाई चौकात माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी ध्वजवंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.