पुणे

आमदाबाद येथील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

CD

शिरूर, ता. १८ : पाबळ-शिरूर रस्त्यावर आमदाबाद (ता. शिरूर) गावच्या हद्दीत हॉटेल विश्‍वजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. परमेश्वर माणिक माळी (वय ३० मूळ रा. माळीवाडी ता.जि. बीड, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदाबाद गावच्या हद्दीत मलठणकडून जाणारा पिकअप क्र. (एमएच ४२- एक्यू ५४८६) व दुचाकी क्र. (एमएच १२- जेएल २१५५) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी माणिक गोविंद माळी (रा. माळीवाडी, ता.जि. बीड) शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुनील कोंडिबा देवकाते (रा. लोणारवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल आगलावे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajura Constituency: राहुल गांधींचा आरोप, पण 'राजुरा'मध्ये 'त्या' लोकांची नोंद झालीच नाही; निवडणूक आयोगाचा दावा

IND vs OMN : ओह shit..! शुभमन गिलचा ऑफ स्टम्प ओमानच्या गोलंदाजांने उखडून टाकला; संजू सॅमसनही गांगरला, Video

Mumbai News : अनिल अंबानी, राणा कपूर विरोधात सीबीआयचे आरोपपत्र सादर

Barshi Crime : अल्पवयीन मुलीला विवाहासाठी बंदुकीची धमकी; दोन मुलांसह आई-वडिलांवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates: कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT