पुणे

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

CD

सासवड, ता. २६ : येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोडी (ता.पुरंदर) गावच्या हद्दीत तालुक्यातीलच माळशिरस येथील एका विवाहितेचा तिच्या पतीने आणि सासूने खून केला. ही घटना शनिवारी (ता. २६) घडली. याबाबत सासवड पोलिस ठाण्यामध्ये त्यांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
पुरंदर तालुक्यातील आंबोडी गावच्या हद्दीत असणाऱ्या वनीकरण भागात एक विवाहित महिला अनिता महेश बनकर (रा.माळशिरस, सध्या रा. पुणे) यांचा खून झाला. यासंदर्भात संशयित आरोपी कमलाबाई पंडित बनकर (सासू), महेश पंडित बनकर (पती) (दोघेही रा.माळशिरस ता.पुरंदर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल आहे. खुनातील मयत महिलेचा भाऊ अनिल हनुमंत चव्हाण, (वय १८, धंदा- मजुरी, रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिता महेश बनकर यांची सासू कमलाबाई पंडित बनकर हिने तू नीट वागत नाही, असे म्हणून व पती महेश पंडित बनकर यांनी संगनमताने अनिता हिचा लग्न झाल्यापासून चारित्र्यावर संशय घेऊन छळ केला. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामावरून जाताना फसवून आणले. वनीकरणामध्ये नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले आहे. याबाबतची तक्रार सासवड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT