सासवड, ता. १६ : पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी गोरखनाथ चव्हाण यांची, तर मानद सचिवपदी संतोष कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेच्या सासवड येथील कार्यालयात निवडणूक पार पडली. यामध्ये सभापतीपदासाठी गोरखनाथ चव्हाण तर मानद सचिवपदासाठी संतोष कुंजीर यांचा एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी आमरीन बागवान यांनी पाहिले. यावेळी केंद्र प्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र जगताप, शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी फडतेर, केंद्र प्रमुख जितेंद्र कुंजीर, उपसभापती दत्तात्रय फडतरे, विस्ताराधिकारी व संचालक राजेंद्र कुंजीर, सुधीर मेमाणे, चंद्रकांत जगताप, राज्य प्रतिनिधी रोहिदास मेमाणे, धनंजय जगताप, गणेश लवांडे, नितिन मेमाणे यांच्यासह इतर संचालक व शिक्षक उपस्थित होते.