पुणे

पुरंदर नागरी पतसंस्थेची बॅंकेकडे वाटचाल

CD

सासवड, ता. २८ : ‘‘सभासदांनी संस्थापक स्व. चंदुकाका जगताप यांच्यावर विश्वास ठेऊन संस्था वाढवल्या. त्यामुळे पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल नागरी सहकारी बँकेकडे सुरू असून, यापुढेही असाच विश्वास ठेऊन आशीर्वाद द्यावेत,’’ असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप आणि उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांच्या वतीने माजी आमदार संजय जगताप यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. संस्थापक स्व चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमा पूजनाने सभेची सुरूवात झाली. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा, तसेच कर्मचारी साधना धेंडे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव केला. संचालक डॉ. विनायक खाडे यांनी प्रास्ताविक, तर सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवालवाचन केले. दिलीप गिरमे, अनंता तांबे, चंद्रशेखर जगताप, नाना भिंताडे, महादेव टिळेकर, राहुल गायकवाड, हरिभाऊ बाठे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
संस्थेच्या ३१ मार्चअखेर संस्थेच्या १३ शाखा, १४ हजार ३४७ सभासद, ३४८ कोटी २२ लाखांच्या ठेवी, २५ कोटींचे अधिकृत भागभांडवल, १३ कोटी २ लाखांचा राखीव निधी, ४ कोटी ४४ लाखांची स्थावर मालमत्ता, ९२ कोटी ९० लाखांची गुंतवणूक, २६६ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज वाटप असून १ कोटी ५ लाख ८८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सतत ऑडिट वर्ग ‘अ’ असून यंदाही संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार जगताप यांनी सांगितले.
यावेळी रमणिकलाल कोठडिया, संदीप फडतरे, मंगेश घोणे, अॅड. युवराज वारघडे, नंदकुमार जगताप, संचालक अंकुश जगताप, राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, अनिल कामठे, बाबासाहेब चौंडकर, चंद्रकांत बोरकर, परशुराम तांबे, सूर्यकांत कांबळे, अमोल सातभाई, अॅड. किशोर म्हस्के, पोपटराव सोनवणे, कल्याण जेधे, सुनील खोपडे, नंदकुमार निरगुडे, घनश्याम तांबे, व्यवस्थापक सतीश शिंदे, हरिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते. नंदकुमार सागर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक आनंदराव घोरपडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'असं कधीच पाहिलं नाही, आम्हीच जिंकलेली ट्रॉफी आम्हाला दिली नाही...' Suryakumar Yadav अखेर स्पष्टच बोलला

Asia Cup 2025: 'भारतीय सैन्याला माझ्या सर्व सामन्यांची फी...', सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला हरवल्यानंतर मोठी घोषणा; Video

IND vs PAK : भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या इभ्रतीचे धिंडवडे; सूर्यकुमार यादव अँड टीमची शांतीत क्रांती... ट्रॉफीच घेतली नाही...

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बालिशपणा, भारताने जिंकलेली ट्रॉफीच पळवली! मॅच प्रेझेंटेशननंतर काय घडलं, BCCI सचिवांनी सगळं खरं सांगितलं

Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार, पण BCCI ने केलंय मालामाल; इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT