सासवड, ता. ३० : शहरातील सोपाननगर परिसरात दोन दिवसांत चोरीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी (ता. २९) रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये चोरट्यांचा चोरीचा मोठा प्रयत्न फसला होता. त्यानंतर मंगळवारी (ता. ३०) सकाळी याच परिसरात असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीतही घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोपाननगर येथील लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाच चोरट्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाचा खर्च टाळून बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. रात्री देवदर्शन करून परत येणाऱ्या ऋषिकेश पवार यांना त्यांच्या मोबाईलवरील सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्यांची चाहूल लागली. त्यांनी तत्काळ सोसायटीतील इतर रहिवाशांना याची माहिती दिली. नागरिकांची धावपळ पाहून चोरट्यांनी जवळच्या शेतातून पळ काढला.
दरम्यान, मंगळवारी (ता. ३०) सकाळी याच परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये सुफिया बागवान यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील सर्व कपाटे उघडली, मात्र त्यांना कोणतीही मौल्यवान वस्तू मिळाली नाही. सलग दोन दिवस झालेल्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या दोन्ही घटनांनंतर सासवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिकांनी पोलिसांना या भागात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.