सासवड, ता. १२ : सासवड (ता. पुरदंर) नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक ७ ब सर्वसाधारण जागेसाठी एक, असे एकूण दोन अर्ज दाखल झाले आहेत. हे दोन्ही उमेदवारी अर्ज जनमत विकास आघाडीकडून दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे यांनी दिली.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबरला एक अर्ज दाखल झाला होता. या निवडणुकीसाठी इच्छुकांनी गर्दी केली असतानाच उमेदवारी अर्ज भरताना त्यांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाच्या समस्या आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज भरताना अचानक संकेतस्थळ बंद पडणे किंवा बाहेर पडणे, यामुळे एका अर्जास दीड तासाचा वेळ लागत आहे. जातवैधता प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयात मोठी गर्दी झाली आहे. पालिका प्रशासनाकडून ‘शौचालय असणे’ आणि ‘थकबाकी नसणे’ याबाबतचा दाखला दुपारी ३ नंतर मिळत असल्याने अर्ज भरण्याची वेळ हुकत आहे. तसेच, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी उपलब्ध नसल्यामुळे उमेदवार आणि सूचकांचे अनुक्रमांक शोधताना अडचणी येत आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.