पुणे

सासवडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ

CD

सासवड, ता. २३ : सासवड (ता. पुरंदर) शहरात सध्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रस्त्यांवर, चौकाचौकात कुत्र्यांची टोळकी दिसून येत आहेत. ही भटकी कुत्री नागरिकांवर हल्ला करीत आहेत. प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
​सासवड शहरात आणि दिवे घाटाच्या परिसरात हॉटेल आणि ढाब्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या ठिकाणांहून शिल्लक राहिलेल्या अन्नावर या मोकाट कुत्र्यांची उपजीविका चालते. त्यामुळे या भागातील कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुणे महानगरपालिकेकडून पकडलेली मोकाट कुत्री दिवे घाटावर आणून सोडली जातात. याच घाटातून सासवडपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल- ढाबे असल्याने कुत्र्यांचे प्रमाण अधिक झाले असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
​मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासवड नगरपरिषद प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठीची कोणतीही सक्षम यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. पुणे महानगरपालिकेकडून होणारे कुत्र्यांचे स्थलांतर आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे सासवडकरांना सध्या या समस्येचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि श्वानदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी नगरपरिषद आणि ग्रामीण प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

रुग्णालयात श्वानदंशाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याबाबतच्या लसींची उपलब्धताही मुबलक आहे. मात्र, या हल्ल्यांच्या घटनांवर मर्यादा आणण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सासवड नगरपरिषद आणि परिसरातील ग्रामीण प्रशासनाला मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची सूचना केली आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचे सांगितले.
- डॉ. गजानन अकमार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, सासवड

06036

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

मराठी बिग बॉस सुरु होणार? कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ, नेटकरी म्हणाले...'बिग बॉसचा ६ वा सिझन...'

धक्कादायक घटना ! 'वांगीमध्ये दोन युवकांनी जीवन संपवले'; परिसरात पसरली शोककळा, सुरेशची आई शेतात गेली अन्..

Latest Marathi News Live Update : घटना घडली तेव्हा घरात नव्हतो, खिडकीतून आत प्रवेश केला, गौरीचा पती अनंत गर्जेचे स्पष्टीकरण

Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

SCROLL FOR NEXT