पुणे

सोपानकाकांच्या समाधी दिन सोहळ्यात हरिनामाचा गजर

CD

सासवड, ता. १७ : संत सोपानकाका महाराज यांच्या सासवड (ता. पुरंदर) येथील समाधी मंदिरात बुधवारी (ता. १७) मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी संत सोपानकाका महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा झाला. यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी करीत केलेल्या हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
संत सोपानकाका महाराजांचा समाधी उत्सव शुक्रवारपासून (ता. १२) शुक्रवार(ता. १९)पर्यंत सासवडमध्ये सुरू आहे. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी या समाधी दिन सोहळ्यानिमित्त केशव महाराज नामदास यांनी वीणा मंडपात समाधी वर्णनाचे कीर्तन सांगून उपस्थितांपुढे समाधी सोहळ्याचा प्रसंग उभा केला. याप्रसंगी राज्यातून आलेले भाविक तसेच दिंड्यांतील वारकरी उपस्थित होते.
सायंकाळी देवस्थानतर्फे प्रवचन, महिन्याचे वारकऱ्यांचे भजन, हरिपाठ, रात्री समाधी वर्णनाचे अभंग, मंदिर प्रदक्षिणा, बाळकृष्णबुवा दिंडीचा जागर झाला. गुरुवारी (ता. १८) सकाळी भोपळे दिंडीतर्फे काल्याचे कीर्तन, दहीहंडी आणि दिंडी प्रदक्षिणा, सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी सकाळी म्हस्कूजी महाराज कामठे यांचे कीर्तन सकाळी ११.३० ते १२ पर्यंत संत सोपानदेव यांच्या समाधीच्या प्रक्षाळ पूजेने उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती अॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.
आळंदी देवस्थानतर्फे विश्‍वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्‍वस्त रोहिणी पवार, बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, सार्थक चोपदार, मुक्ताई देवस्थानतर्फे संदीप महाराज पाटील, देहू देवस्थान विश्‍वस्त माणिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थान विश्‍वस्त अॅड. माधवी निगडे, हिरूकाका गोसावी, श्रीकांत गोसावी, चोपदार सिद्धेश शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"घरचेच काम देत नाहीत बाहेरचे काय देणार ?" प्रसिद्ध दिग्दर्शकाचा सख्खा भाऊ करतोय ड्रायव्हरचं काम; मुलगा गंभीर आजारी

Latest Marathi News Live Update : बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी उद्या एकनाथ शिंदेंची जाहीर सभा

ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

SCROLL FOR NEXT