पुणे

तळेगावातील महादेवाची मंदिरे पर्यटकांसाठी पर्वणी

CD

नागनाथ शिंगाडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) गावाला ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभला आहे. दक्षिणेकडे भीमा नदी आणि उत्तरेकडे वेळ नदी, तसेच बेल्हा - जेजुरी महामार्ग, अहिल्यानगर -पुणे महामार्ग (बाह्यवळण), चाकण - शिक्रापूर - न्हावरा राष्ट्रीय महामार्ग आदी रस्त्यांचे जाळे गावातून जात आहे. गावातील पुरातन मंदिरे असल्याने अर्धी काशी म्हणून गावाची ओळख आहे. याच गावात पुरातन महादेवाची विविध मंदिरे असून श्रावण महिन्यात पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र बिंदू ठरली आहेत.

श्री काकडेश्वर (काकलेश्वर):- हे महादेवाचे मंदिर गावाच्या मध्यभागी असून, पूर्वाभिमुख मराठाकालीन शिवमंदिर आहे. ते शिलालेखानुसार रविवार, कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके १७१२ म्हणजेच सात नोव्हेंबर १७९० मध्ये बांधले आहे. हे मंदिर शके १८४८ पर्यंत काकलेश्वर या नावाने ओळखले जात होते. मंदिर स्थापत्य मांडणीमध्ये सभामंडप व गर्भगृह यांचा समावेश होतो. दक्षिणेकडील बाजूस अतिरिक्त दरवाजा असून प्रवेशद्वाराच्या ललाटावर गणेशाची प्रतिमा आहे. हे मंदिर वायुलिंग पुरानानुसार बांधले असून गर्भगृहास दोन दरवाजे आहेत तसेच या शिवलिंगाची सोमसूत्री ईशान्य दिशेस असून असे महाराष्ट्रातील एकमेव शिवलिंग आहे.

श्री उत्तरेश्वर मंदिर : हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची उभारणी इ.स.१७०७ मध्ये झाली आहे. मंदिर परिसरात अनेक वीरगळ असून, महादेवास समर्पित आहे. मंदिरात तुळजाभवानी व उत्तरेश्वर महादेवाची समारोसमोर मंदिरे असून गणपती व मारुती या उपदेवतांची मूर्ती आहेत. शिखरावर अनेक देव देवता, अप्सरा, अष्टदिगपाल ह्यांच्या मूर्ती कोरल्या आहेत.

भीमाशंकर मंदिर :- हे मंदिर गावच्या वायव्येस असून पश्चिममुखी आहे. हेमाडपंथी बांधणीचे असून, जमिनीपासून उंचावर आहे. काही पायऱ्या चढल्यावर समोर नंदी मंडप आहे. मंदिराबाहेरील बाजूस एक लेख असून आपाजी करंजे यांचा मुलगा मोरा शेटी आणि घना शेटी यांनी भीमाशंकर मंदिर १४ फेब्रुवारी १७४३ मध्ये बांधल्याचे समजते. नंदीमंडपात नंदी असून पुढे सभामंडप आहे. सभामंडपातून गर्भगृहात जाताना प्रवेशद्वारावर गणपती व द्वारपाल आहे. आतमध्ये महादेवाचे मोठे शिवलिंग असून पूर्वेकडून देऊळीमधून सूर्यप्रकाश शिवलिंगावर पडतो.

शिद्धेश्वर मंदिर:- हे मंदिर १६ मार्च १७३२ मध्ये बांधले आहे. भव्य मंदिर गावाच्या मुख्यवस्तीत असून तेथे सहज पोचता येते. पूर्वेकडे तोंड असून, गणपती व काकडेश्वर मंदिराने वेढलेले आहे. सिद्धेश्वर मंदिर एका उंच व भव्य कुंपणाच्या भिंतीने वेढलेले आहे. दोन प्रवेशद्वार आहेत, एक पूर्वेला व एक पश्चिमेला. शिव मंदिराचे दर्शन घडवणारा गर्भगृहही येथून दिसतो. नैऋत्य व आग्नेय बाजूला उप-मंदिरे आहेत. मंदिराच्या शिखरावर अनेक देव देवतांच्या मूर्ती असून भिंतचित्रे रेखाटली आहेत.

महादेव मंदिर (मुख्य वेस): - हे मंदिर पूर्वाभिमुख असून मारुती मंदिराशेजारी आहे. या मंदिराची रचना सभामंडपाला जोडलेला नंदीमंडप आणि गर्भगृह अशी आहे. नंदीमंडपाला एक शिखर आहे. सभामंडपाला तीन कमानी आहेत. गर्भगृहात एक शिवलिंग आहे. महादेव मंदिरासमोर एक विहीर आहे.

श्री रामेश्वर मंदिर: - हे मंदिर मराठा काळातील आहे. गावाच्या उत्तरेला ''वेळ नदीच्या काठी आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या रचनेत नंदीमंडप, सभामंडप आणि गर्भगृह यांचा समावेश आहे. मुख्य गर्भगृहात श्री रामेश्वराचे शिवलिंग आहे.

श्रीनाथ मंदिर : श्रीनाथ व काशी-विश्वेश्वराची मंदिरे येथील सामायिक मंदिर संकुलात आहेत. दोन्ही मंदिरे सुस्थितीत वेळनदीच्या तीरावर बांधलेली आहेत. एका मजबूत तटबंदीने वेढलेले आहे. या भिंतींना दोन प्रमुख प्रवेशद्वार आहेत: एक पूर्वेला आणि दुसरे दक्षिणेला. पूर्वेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर, पर्यटक मंदिर संकुलात प्रवेश करतात. प्रवेशद्वाराला लागून कमानीदार कप्पे आहेत. नदीच्या पात्रात काही अपूर्ण शिल्पे आणि अर्धवट कापलेले दगड आढळतात. मंदिर प्रसिद्ध आहे. श्रावण व महाशिवरात्री निमित्ताने येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.


07893

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT