पुणे

बाजारभाव निम्म्याने कोसळल्याने स्वीटकॉर्न ‘कडू’

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१० : उत्पादन खर्च जास्त तसेच बाजारभाव निम्म्याने कोसळल्यामुळे मका पीक उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मशागतीचा खर्च अवाढव्य वाढला असून बियाणेही महागली आहेत. बियाणे २५०० रुपये किलोने घ्यावे लागले होते. मात्र सध्या ओली मका व कणसे चार ते पाच रुपये किलोने विकली जात आहेत. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.
शिरूर तालुक्यातील करंजावणे, दहिवडी, इंगळेनगर व इतर भागात मोठ्या प्रमाणात स्वीटकॉन मका शेतकऱ्यांनी केली आहे. योग्य बाजारभाव नसल्याने ते संकटात सापडले आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेसारख्या देशाने टेरीफ वाढवल्याने भारतातून होणारी फ्रोजन स्वीट कॉर्न निर्यात अचानक बंद झाली आहे. स्थानिक फ्रोजन कंपन्यांनी आपला साठा पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याचे सांगून ठेवायला जागा नसल्याने आता काढणीसाठी आलेल्या स्वीटकॉर्न पिकाच करायच तरी काय? असा प्रश्न स्वीट कॉर्न उत्पादक शेतकऱ्यांना पडलेला आहे.

यामुळे बाजारभावात घसरण
१. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, दिल्ली आदी राज्यांत स्वीटकॉर्नच्या लागवड क्षेत्र वाढ
२. बंपर उत्पादन मिळत असल्याने मागणीवर थेट परिणाम
३.अमेरिका देशाने निर्यात पॉलिसी बदलल्याचा स्वीट कॉर्नवर परिणाम
४. जागतिक बाजारपेठेवर ट्रेडवार झाल्याने स्वीटकॉर्नच्या दरामध्ये मोठी घसरण


हजारो एकर क्षेत्र तोडणीविना पडून
स्वीटकॉर्न मका पीक अल्पकाळात माफक उत्पन्न देणारे असल्याने शेतकऱ्यांचा ओढा या पिकाकडे आहे. हवामानाची उत्तम साथ असल्याने यंदा बंपर उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. प्रतिकिलोला १५ ते २० रुपये सरासरी मिळणारा बाजारभाव आता अवघ्या पाच, सहा रुपयापर्यंत घसरला आहे. त्यामुळे उत्पादनखर्च देखील भागत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या हजारो एकर क्षेत्र तोडणी विणा शेतकऱ्यांनी सोडून दिल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.


स्वीटकॉर्न मका पिकाची वाढत चाललेली लागवड लक्षात घेता मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव पद्धतीने करार करून शेती केली तर शेतकऱ्यांना स्वीटकॉर्न मका शेती फायद्याची ठरेल.
- घनश्याम तोडकर, संचालक, प्रोसेसिंग स्वीट कॉर्न मका युनिट तळेगाव ढमढेरे.

आम्ही दोन एकर मका लावली आहे. त्याला योग्य बाजारभाव मिळाला नाही. बाजारामध्ये पाच ते सहा रुपये बाजारभाव मिळत आहे. वाहतुकीचा खर्च व मजुरीचा खर्च तसेच औषधे, खत, पाणी आदींचा खर्च अवाढव्य वाढल्यामुळे आमच्या हातात काहीही मिळत नाही. शासनाने मका उत्पादकांकडे विशेष लक्ष देऊन बाजारभाव वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.
- सुनील कुलाळ, मका उत्पादक

08036, 08035

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Politics: विदर्भातील शहरी क्षेत्रावर प्रभाव कोणाचा?; भाजपा व काँग्रेसमध्येच खरी लढाई; दिग्गज नेत्यांचा कस लागणार..

Latest Marathi News Live Update :निवडणुक आयोगाच्या भेटीनंतर मनसे नेते राज ठाकरेंच्या भेटीला

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

SCROLL FOR NEXT