पुणे

पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस

CD

अस्तित्व टिकविण्याची कसरत

पुणे जिल्ह्यात ज्यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाची धुरा होती, त्याच नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे आता काँग्रेसचा पंजा दुर्बीण लावूनही दूरदूरपर्यंत दिसत नाही. अस्तित्वाची लढाईच सध्या जिल्ह्यात काँग्रेसला लढवी लागणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा हात पकडून काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवायला लागणार आहे.

-नागनाथ शिंगाडे, तळेगाव ढमढेरे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला गेला होता. मात्र, जिल्ह्यात काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात नेहमी पवारविरोधी भूमिका घेणाऱ्या भोरचे थोपटे, इंदापूरचे पाटील आणि पुरंदरच्या जगताप या घराण्यांनी काँग्रेसचा झेंडा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नेहमीच फडकावत ठेवला. आघाडीच्या राजकारणातही या नेत्यांना नेहमीच पवारांना विरोध केला. त्यातून हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसने नेहमीच ताकद दिली. मात्र, त्यांनी कॉंग्रेसचा हात सोडला आणि कमळ हाती घेतले. त्यावेळी पुरंदरच्या संजय जगताप यांनी आक्रमपणे जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी थेट हर्षवर्धन पाटील यांच्याशीही इंदापूरमधील काँग्रेस भवनच्या जागेवरून दंड थोपाटले. सुरुवातीला माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि नंतर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनीही आपला भोर- वेल्हे- मुळशीचा गड कॉंग्रेस विचारांचा ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून मागील विधानसभेवेळी जिल्ह्यात दोन आमदार काँग्रसचे विजयी झाले होते. एकंदर काँग्रेस आपले बालेकिल्ले सांभाळून होते. मात्र, आताच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोनही आमदार माजी झाले आणि कॉंग्रेसची उतरतीकळा सुरू झाली. शिलेदार अपेक्षित ताकद मिळत नसल्याने जेरीस आले होते.
विधानसभेतील पराभवानंतर सुरुवातीला संजय जगताप आणि नंतर भोरच्या संग्राम थोपटे या माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला काही काळ जिल्हाध्यक्षपदही रिक्त ठेवावे लागले होते. त्या काळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून संग्राम मोहोळ हे काम पाहत आहेत. यापूर्वी प्रदीर्घकाळ देविदास भन्साळी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या पुण्यात वारंवार बैठका झाल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी म्हणूनच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान, श्रीरंग चव्हाण यांच्या खांद्यावर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचेच आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर आणि संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली वेल्हे पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता होती, तसेच इंदापूर, वेल्हे पंचायत समितीही ताब्यात होती. संजय जगताप यांच्या नेतृत्वात सासवड आणि जेजुरी नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा होता. मात्र, येथे आता अस्तित्वाची लढाई आहे. तसेच, जुन्नरमध्ये सत्यशील शेरकर यांच्या रूपाने तरुण नेतृत्व होते. मात्र, त्यांनीही शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकराले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच ठिकाणी काँग्रेसला घरघर लागली आहे. तरीही जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या विचारांचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यांना ताकद देण्याचे काम पक्षातर्फे केले जात आहे. पक्षाच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ‘व्होट चोर-खुर्ची सोड’ या स्वाक्षरी मोहिमेअंतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय दौऱ्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी व संघटना मजबुतीसाठी पुणे जिल्हा अंतर्गत मतदारसंघनिहाय नियोजन केले आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य कौस्तुभकुमार गुजर, श्रीरंग चव्हाण, संग्राम मोहोळ, शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन नरके यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाच्या आगामी वाटचालीची जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्ष जो आदेश देतील, त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे. निवडणुका स्वबळावर लढवायच्या की आघाडी करून लढवायच्या हे प्रदेश अध्यक्ष लवकरच बैठक घेऊन सांगणार आहेत. सर्व इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाच्या विचाराची २५ टक्के मते कायम आहेत. पक्षाची पुढील वाटचाल केंद्रीय पक्ष यंत्रणेवर अवलंबून राहील, असे त्यांनी सांगितले आहे.

पक्ष जिवंत ठेवण्याची धडपड
राज्यात महाविकास आघाडी आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला. जेथे शक्य असेल तेथे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने निवडणूक लढवली. वरिष्ठ पातळीवरील आदेशाचे जिल्हा व तालुका पातळीवर आगामी निवडणुकीसाठी नियोजन केले जाणार आहे. जेथे काँग्रेसची ताकद आहे, तेथील इच्छुक उमेदवारांना काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी करण्याची सूचना दिली आहे. तरीही जिल्ह्यात सध्या काँग्रेस पक्षाला प्रबळ नेतृत्वाची गरज असून, संघटनात्मक काम व कार्यकर्त्यांना राजकीय पाठबळ देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युवकांचे संघटन होणे गरजेचे आहे. लहान-मोठ्या निवडणुका लढवून सत्तेत सहभागी होणे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्याला महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT