पुणे

अपघातात गंभीर जखमी झालेल्या तळेगावच्या दोनही युवकांचा मृत्यू

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १६ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथून नारायणपूर (ता. पुरंदर) येथे श्री दत्ताच्या दर्शनासाठी गेलेल्या युवकांच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोन युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तळेगाव ढमढेरे येथील समीर संभाजी ढमढेरे (वय २१) व सार्थक विजय ढमढेरे (वय २०) व दीपक दत्तात्रेय ढमढेरे हे तिघे युवक दुचाकीवरून गुरुवारी (ता. ११) नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून तळेगाव ढमढेरे येथे घरी परतत असताना शिंदवणे घाटात समोरून भरधाव आलेल्या टेम्पोची त्यांच्या दुचाकीला जोरात धडक बसून अपघात झाला. त्यात समीर व सार्थक हे दोघे गंभीर जखमी झाले, तर दीपक किरकोळ जखमी झाला होता. गंभीर जखमी असलेल्या समीर व सार्थक यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. १६) सकाळी दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत दीपक ढमढेरे याने उरुळी कांचन (ता. हवेली) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांवर मंगळवारी तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्याही मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Missing Minors Fact : मुंबईत ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले खरंच बेपत्ता ? मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण, नेमकं काय सांगितले?

Numerology News: मूलांक 2 चे लोक या 4 क्षेत्रांमध्ये चमकवतात आपले भाग्य; लवकर मिळवतात नाव आणि प्रतिष्ठा!

PAK vs AUS: पाकिस्तानी चिटर! Out नसताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अंपायरने दिले बाद, Video Viral

Cigarette: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा धक्का! सिगारेटच्या किमती ५५ रुपयांनी वाढल्या; तुमच्या आवडत्या ब्रँडचा नवीन दर किती? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update: हॉटेलमध्ये रुमबॉयचे काम करणाऱ्या तरूणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT