पुणे

टाकळी भीमा येथे पाळीव कुत्र्याचे पिल्लू ठार

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१७ : टाकळी भीमा येथील शेतकरी बाळासाहेब घुमे यांच्या शेतातील फार्म हाउसच्या प्रांगणात बिबट्याने हल्ला करून पाळीव कुत्र्याच्या पिल्लाला ठार केले आहे. मंगळवारी (ता.१६) रात्री ही घटना घडली.
बाळासाहेब घुमे हे मूळचे तळेगाव ढमढेरे येथील असून, त्यांचा फार्म हाउस टाकळी भीमा हद्दीत आहे. शेतातील घराच्या प्रांगणात बंद असलेल्या विद्युत मोटारीला कुत्र्याचे पिल्लू साखळीने बांधले होते. रात्रीच्या सुमारास बिबट्याने पाळीव कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला करून ठार केले. विशेष म्हणजे कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी बिबट्या हळूहळू कुत्र्यापर्यंत आला त्यानंतर कुत्र्याला तोंडात धरून विद्युत मोटारीसह ओढत नेले. घरातून आवाज आल्याने बिबट्याने धूम ठोकली. ही सर्व घटना त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शेतातील घर असूनही घुमे यांनी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. विशेष म्हणजे घुमे यांनी दोन दिवसांपूर्वीच कुत्र्याचे पिल्लू नवीन आणले होते. त्याच्यावरच बिबट्याने दबा धरून हल्ला केल्याने घुमे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. दरम्यान, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, विठ्ठलवाडी, धानोरे व तळेगाव ढमढेरे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य वाढले असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले होऊन नुकसान झाले आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील बहुतांश नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या भीतीने शेतीची कामे करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. वनविभागाने येथील परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाळासाहेब घुमे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: गरिबीची थट्टा, मारहाण अन्... शाळेतच शिक्षक आणि मैत्रिणींचं विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कंटाळून मुलीचा टोकाचा निर्णय

लाल दहशतवादामुळे आदिवासींपर्यंत विकास गंगा पोहोचली नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

T20 World Cup: नेपाळच्या संघाकडून बलाढ्य इंग्लंडची दमछाक अन् शेवटच्या चेंडूवर अवघ्या ४ धावांनी थरारक विजय

Latest Marathi News Live Update : प्रगटदिनी श्री गजाननाच्या भक्तीरसात न्हाली विदर्भपंढरी

Mumbai Goa Highway Traffic : इंदापूर-माणगाव वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप, बाह्यवळण मार्गाचे काम खोळंबल्याने समस्या

SCROLL FOR NEXT