पुणे

महामार्ग गावातून नेण्यास ग्रामस्थांचा विरोध

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) या गावातून शिक्रापूर-न्हावरा हा राष्ट्रीय महामार्ग जात असून, या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. हा राष्ट्रीय महामार्ग गावातून नेण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग गावातून नेल्यास विविध अडचणींना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागणार असल्याचे ग्रामसभेतील ठरावात काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या समस्यांविषयी ग्रामस्थांतर्फे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवले असून, तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांनी विविध समस्या लक्षात घेऊन गावातून या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींची त्वरित स्थळ पाहणी करून गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा आढावा घेऊन सामंजस्याने नियमानुसार रस्त्यासंदर्भात तोडगा काढावा अशी सूचना कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे केली आहे.

तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांच्या समस्येविषयी तात्काळ चर्चा करून शिक्रापूर-न्हावरा महामार्गसंदर्भात सामंजस्याने तोडगा काढला जाईल.
- ऋषिकेश हजारे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

MPSC Result : क्लास वन अधिकारी होऊन केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सातारारोडच्या कन्येची भरारी; MPSC परीक्षेत राज्यात पटकावला नववा क्रमांक

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्र निमित्त वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात महास्वच्छता अभियान

Pune Crime : मुलाने दारुच्या नशेत वडिलांना जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना

Vasai Fire: वसईत कंपनीला भीषण आग! आगीचा भडका अन् धुराचे लोट परिसरात पसरले; घटनेनं भीतीचं वातावरण, Video Viral

SCROLL FOR NEXT