पुणे

बांधकाम तपासणी न करताच पूल पुन्हा सुरू

CD

टाकळी हाजी, ता. २३ : कुंडमळा (ता. मावळ) येथील पूल कोसळल्याने धास्तावलेल्या प्रशासनाने अचानक पत्रव्यवहार करीत टाकळी हाजी (ता. शिरूर) जगप्रसिद्ध रांजणखळगे येथील चांगल्या अवस्थेत असलेला पूल बांधकाम तपासणीच्या नावाखाली बंद केला होता. मात्र, बांधकाम तपासणी न करता नवरात्री निमित्ताने भाविकांची ओढावणारी नाराजी लक्षात घेऊन तब्बल अडीच महिन्यांनी ग्रामपंचायतीने हा पूल घटस्थापनेच्या दिवशी सुरू केला आहे.
येथे तिर्थक्षेत्र पर्यटन विकास निधीतून जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड येथे झुलता पूल सन २०११ मध्ये उभारण्यात आला आहे. त्यासाठी २५ लाख रुपये खर्च झाले आहेत. या पुलामुळे पर्यटक व भाविकांना रांजणखळग्याच्या पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून फिरता येत होते. झुलता पूल हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्कालीन उपअभियंता युवराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आला आहे. अंत्यत मजबूत असलेला या पुलाची किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत करीत आले आहे.
काही महिन्यापूर्वी मावळ येथील कुंडमळा येथे पूल कोसळला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना पत्रव्यवहार करून हा पूल देखभाल दुरुस्तीसाठी तुमच्याकडे असल्याचे कळविले. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम खात्याने या पुलाची तपासणी केल्याशिवाय सुरू करू नका म्हणून सूचना दिल्या होत्या. त्यामुळे तत्काळ पूल बंद केला होता. गेली अडीच महिने पूल बंद आहे, तरी सुद्धा अद्याप तपासणी करण्यात न आल्याने भाविक व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
हा पूल बांधलेल्या कलंत्री इंजिनिअरिंग या कंपनीने २१ जून रोजी पाहणी करून पूल सुस्थितीत असल्याचे पत्र शुक्रवारी (ता. १९) ग्रामपंचायतीला दिले. ग्रामपंचायतीने किरकोळ डागडुजी करून पूल सुरू केला आहे.

आम्ही बांधकाम तपासणीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, ते न झाल्याने भाविकांना नवरात्रात त्रास होऊ नये म्हणून बांधकाम विभागाला कळून पूल सुरू केला आहे .
- राजेंद्र खराडे, ग्रामविकास अधिकारी.

पुलाच्या बांधकाम तपासणीसाठी पाठपुरावा सुरू असून लवकर तपासणी होईल .
-अनिल गावडे, शाखा अभियंता

00666

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

Poisioning : झारगडवाडीत भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचा संशय; ४ महिलांवर उपचार सुरू

Mohol News : नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, बाधित झालेल्या सर्व घटकांच्या नोंदी घ्या; योगेश कदम यांनी दिल्या सूचना

Dickie Bird: क्रिकेटविश्वात शोककळा ! भारताच्या १९८३ वर्ल्ड कप विजयाचे साक्षीदार राहिलेल्या दिग्गजाचे निधन

SCROLL FOR NEXT