पुणे

टाकळी हाजीतील निवासस्थान जीर्णावस्थेत

CD

संजय बारहाते
टाकळी हाजी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान सध्या अत्यंत जीर्णावस्थेत असून ते धोकादायक बनले आहे. इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. तरीदेखील काही कर्मचारी जीव मुठीत घेऊन या निवासस्थानात राहत आहेत.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपरखेड, जांबूत, फाकटे, वडनेर अशी चार उपकेंद्रे कार्यरत आहेत. सुमारे ४० हजार लोकसंख्या या केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवा घेत आहे. परिसरातील काठापूर, चांडोह, शरदवाडी, माळवाडी, म्हसे, डोंगरगण, निमगाव दुडे आदी गावांतील रुग्ण या केंद्रात येतात. दररोज सुमारे १०० रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, परिसरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, या केंद्राची मुख्य इमारत सुमारे ४० वर्षां पूर्वीची आहे . वारंवार दुरुस्ती करूनसुद्धा इमारत व निवासस्थान मोडकळीस आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी एक नवीन निवासस्थान बांधण्यात आले असले तरी इतर कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुरक्षित राहण्याची सोय नाही. त्यामुळे काही कर्मचारी मोठ्या धोक्याचा सामना करत जुनी इमारत वापरत आहेत. अनेक वेळा स्लॅबचे सिमेंट खाली पडत आहे.

पिंपरखेड, जांबूत उपकेंद्रांतील जागा रिक्तच
पिंपरखेड व जांबूत उपकेंद्रांतील समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा अनेक दिवसांपासून रिक्त असून, त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यात अडथळे येत आहेत. नागरिक व स्थानिक प्रतिनिधींनी या रिक्त जागा तातडीने भराव्यात तसेच टाकळी हाजी आरोग्य केंद्रासाठी नवीन निवासस्थान बांधण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

0762

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 5th T20I: इशान किशन खेळणार, संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या बॅटींग कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स

EXCLUSIVE: प्रभूचा कंटेन्ट अश्लील असूनही त्याला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर एकदा वाचाच

Budget Expectations 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

Latest Marathi News Live Update : जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Pune School Bus: वाघोली अपघात! पुण्यात स्कूल बसची सुरक्षा वाऱ्यावरच; नेमकी नियमावली काय?

SCROLL FOR NEXT