पुणे

बिबट्यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळित

CD

संजय बारहाते

टाकळी हाजी, ता. १८ : जांबूत, पिंपरखेड, बेट भागासह शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या वाढत्या हल्यांमुळे ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला असून शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थी सर्वच वर्ग भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहेत. पहाटे घराबाहेर पडणे, शेतात जाणे, सायंकाळी देवळात जाणे यांसारखी दैनंदिन कामेसुद्धा धोकादायक झाली असून ग्रामीण भागातील जनता घरातच कैद झाली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती दिली. मात्र, ग्रामीण जनतेचे म्हणणे आहे की, परवानगी मिळाली असली तरी या परिसरातील सर्व बिबटे सुरक्षितरीत्या पकडून नेल्याशिवाय लोकांची भीती कमी होणार नाही. वनविभाग सातत्याने गस्त, सापळे आणि हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करीत असला तरी सर्व बिबट्यांना पकडून हलविल्याशिवाय ग्रामीण जीवन सुरळीत होणार नाही, अशी भावना जनतेत व्यक्त होत आहे. शिरूर तालुक्यातील बिबट्यांचे संकट हे आता केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा विषय नसून ग्रामीण जीवन, अर्थव्यवस्था आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्‍न बनले आहे.

मजूर वर्गाने शेतीकामे करण्यास भीती
ऊसतोड, कांदा लागवड, बांधणी, डांळिब बागकामासाठी बाहेरून मजूर येतात. पण आता “बिबट्या असलेल्या भागात काम नको” असे म्हणत अनेक मजूर शिरूरमध्ये येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे मजूरटंचाई निर्माण होऊन काम वेळेत होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

ग्रामीण शाळांवरही सावट
उसाच्या जंगली पट्ट्यामध्ये असलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळांजवळ दिवसाढवळ्या बिबट्या फिरताना दिसत आहेत. पालक-शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण असून मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना रोज सोबत जावे लागत आहे. सायकलने किंवा पायी फडातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला होण्याची भीती कायम आहे.



या उपाययोजना आवश्‍यक
बिबट-प्रभावित (लेपर्ड-प्रोन) क्षेत्रांसाठी विशेष पॅकेज
सुरक्षा कंपाउंडसाठी सबसिडी
नरेगा कामांमध्ये कुंपणाचा समावेश
घर व शेती सुरक्षा कंपाउंडसाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष अनुदान योजना
नरेगामध्ये घर व शेती कुंपण कामाचा समावेश
ग्रामीण शाळांना दहा फुटापर्यंत सुरक्षाभिंती
मेंढपाळांना सौर कुंपण, सौर टॉर्च व सुरक्षा साधने
वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची सोय
शेतीपंपाच्या कामांना मंजुरी देऊन दिवसा वीजपुरवठा
शाळा, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी सौर दिवे
एआय आधारित ‘बिबट्या आला की सूचना देणारी सायरन’ यंत्रणा
मागणी तेथे पिंजरा लावणे



शेत कामात महिलांचा सहभाग मोठा असतो, अनेकांचे शेत राहत्या घरापासून दूर आहे . एकट्या महिलांना जीव धोक्यात घालून शेतात कामाला जावा लागते . त्या वेळेस बिबट्यांचा धोका जास्त असतो .
- पुष्पा गांजे, सरपंच, शरदवाडी (जांबूत)

जो पर्यंत या भागातील शेवटचा बिबट्या पकडून नेत नाही, तो पर्यंत नागरिकांना सतत बिबट्यांच्या भीतीखाली राहावे लागेल. वेळ गेला तर पुन्हा हल्लेही होतील. त्यामुळे आधुनिक यंत्रणा लाऊन लवकर बिबटे जेरबंद करायला हवेत.
- राजेंद्र दाभाडे, सरपंच, पिंपरखेड

वन विभागाला नवीन ३८ पिंजरे उपलब्ध झाले असून १२ ठिकाणी एआय तंत्रज्ञान, कॅमेरे, सायरन सिस्टीम यांचा वापर करून बिबटे पकडण्यासाठी वन विभाग काम करीत आहे.
- निळकंठ गव्हाणे, वन परीक्षेत्र अधिकारी, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT