पुणे

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ध्वजवंदन

CD

थेऊर, ता. १९ : येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. अंजीर संशोधन परिषदेचे अध्यक्ष अप्पासाहेब काळभोर व सामाजिक कार्यकर्ते रमेश मेमाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमात पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले, तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गीत सादर केले. आठवीची तनिष्का जगताप हिने ‘तेरी मिट्टी’ या गाण्याने सर्वांची मने जिंकली. क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांजल काळभोरच्या नेतृत्वाखाली आर. एस. पी. ग्रुपने संचलन केले. दुर्गा लक्ष्मीच्या अश्वावर सातवीची सृष्टी पायघन हिने स्वार होऊन परेडची आकर्षण ठरली.
नृत्य शिक्षक अश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तिरंगा’ या गाण्यावर सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली जन्मदाती आई व मातृभूमीबद्दलची आस्था व निष्ठा नृत्यामधून सादर केली. नृत्य व संगीताबरोबरच कराटे प्रशिक्षक प्रफुल्ल गायकवाड यांनी कराटे व स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली, तर दीपक शितोळे यांनी आकर्षक फलक लेखनाने लक्ष वेधले.
काळभोर यांनी संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीने फुलवलेल्या आपल्या शेतीला भेट देण्यासाठी त्यांनी विद्यार्थी व पालकांना आमंत्रित केले. यावेळी स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर, सेक्रेटरी मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्या प्रशांत लाव्हरे, पर्यवेक्षक पायल बोळे, रेनबो किड्स कायझन स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर, प्रथमेश काळभोर, रामदास काळभोर आदी उपस्थित होते. भाग्यश्री सुरवसे व पार्थ सुभेदार यांनी सूत्रसंचालन केले, तर उदय कदम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : चोरीच्या पैशातून चंगळ, ६ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, १० वर्ष जंगलात लपून बसला; सराईत बाईकचोराला अशी झाली अटक

Latest Marathi Breaking News : शिवसेनेला मोठा धक्का; अजून काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

Hotstar सब्स्क्रिप्शन पूर्णपणे फ्री! सोबत मिळणार 15GB डेटा, काय आहे हा धमाकेदार प्लॅन? जाणून घ्या

Mumbai CNG crisis: कसं होणार मुंबईचं? सीएनजी तुटवड्याने थबकली... ऑटोचं भाडं किती वाढलं? विमानतळावर जाण्यासाठी कॅबसुद्धा नाही

Gadhinglaj News: गडहिंग्लजमध्ये चार पक्षांची महाआघाडी एकत्र; राष्ट्रवादीविरोधात रंगणार थरारक लढत!

SCROLL FOR NEXT