थेऊर, ता.२१ : दौंड तालुक्यातून गांजा घेऊन निगडी येथे विक्री करण्यासाठी निघालेली रिक्षा लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) रेल्वे पूल सेवा रस्त्यावर रविवारी (ता.२१) सकाळी सव्वानऊच्या सुमारास पकडला आहे. या रिक्षात सुमारे १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा सापडला आहे. पोलिसांनी रिक्षासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एका तस्कराला अटक केली आहे.
लक्ष्मण राजू पवार(वय ३०,रा. यमुना नगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम निगडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. तर रवी अण्णा कुऱ्हाडे, चंद्रकांत सुरेश पवार(वय २८, रा.बोरीऐंदी ता.दौंड) व एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
कर्डिले यांना थेऊर रेल्वे पुलाच्या जवळ असलेल्या सेवा रस्त्यावरून गांजाची तस्करी होणार आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. तेव्हा ज्ञानेश्वर आंदेकर यांच्या शेतजमिनी लगत पोलिसांनी एक संशयास्पद रिक्षा पकडला. तेव्हा रिक्षामध्ये लक्ष्मण पवार हा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेल्या गोणीची झडती घेतली असता, त्यामध्ये सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला रवी कुऱ्हाडे हा सुद्धा रिक्षात बसलेला होता. मात्र, त्याला पोलिस आल्याची चाहूल लागताच, तो रिक्षातून उडी मारून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पवारला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा हा चंद्रकांत सुरेश पवार व त्याच्या सोबत मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तीकडून घेऊन विक्रीसाठी चालविला असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. ही कारवाई लोणी काळभोरचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलिस हवालदार गणेश सातपुते, अण्णा माने, रामहरी वणवे, पोलिस अंमलदार राहुल कर्डिले, प्रवीण धडस, चक्रधर शिरगिरे, सचिन सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.