पुणे

शरीर सुखाची मागणी; एकावर गुन्हा दाखल

CD

थेऊर, ता. २७ : एका रीलस्टारकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय पीडित रीलस्टारने दिलेल्या फिर्यादीवरून कानिफनाथ सुदाम जगदाळे (वय ३९, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडिता ‘रीलस्टार’ या पती व मुलांसोबत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रम पाहत असताना कानिफनाथ तेथे आला. त्यावेळी त्याने, ‘तुमच्याकडे काम आहे,’ असे कारण सांगून तिला एका बाजूला बोलाविले व ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस, तू माझ्यासोबत एक रात्र झोप,’असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले. याबाबत तिच्या पतीने जाब विचारताच जगदाळे याने,‘ मी तुझ्या पत्नीला बोललो आहे, तुला काय करायचे आहे ते कर, तू जास्त बोलला तर तुझे हातपाय काढून टाकीन,’ अशी धमकी दिली. पीडित रीलस्टारने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जगदाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; पोलिस येणार अडचणीत

Madha News : अडाणी बापलेकांनी स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय पावसात थांबून सुमारे २०० जनावरांचे वाचवले जीव

PMRDA DP Issue : पीएमआरडीएचा डीपी रद्द; राज्य शासनाने काढली अधिसूचना

SCROLL FOR NEXT