थेऊर, ता. २० : कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील जे. के. सेल्सच्या गोदामास रविवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामध्ये सुमारे दोन कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या.
दुकानातून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, एसी, पिठाची गिरणी,फॅन, गिझर, फिल्टरसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री केली जाते. या दुकानाचे गोदाम शिवम हॉस्पिटलच्या रस्त्यावर आहे. गोदामाच्या बाहेर वायरचे शॉर्टसर्किट झाल्याचे रविवारी (ता.१९) रात्री आढळून आले. गोदामाच्या दिशेने जाणारी वायर जळताना दिसली. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती जे. के. सेल्सचे संचालक अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांना दिली. घटनास्थळावर पोहचेपर्यंत गोदामाच्या शटरमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
हडपसर येथील अग्निशामक दलाला पाचारण केले, अग्निशामक दलाच्या दोन वाहने अर्ध्या तासाच्या फरकाने आल्या. तोपर्यंत नागरिकांनी पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचे तांडव नृत्य सुरू होते. शेवटी गोडाऊनचे चारही शटर तोडून टाकली आणि वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु, सर्व वस्तूंनी पेट घेतला होता.
मागील एक महिन्यापूर्वी कदमवाकवस्ती येथे अतिवृष्टी झाली होती. यावेळी जे.के.फर्निचर, जे.के.सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन, आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी या तीन व्यावसायिक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तीन कोटींचे नुकसान झाले होते. त्यातच आता जे.के.सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन जळून खाक झाले आहे. यामध्ये २ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे असे एकूण पाच कोटी रुपयांचा फटका दुकानदाराला बसला आहे.
गोदामातील ३५० फ्रिज, ५० टीव्ही, ९० वॉशिंग मशिन, ४० कुलर, ७० एसी, १२ पिठाची गिरणी, पाच फॅन, ४० गिझर, २५ फिल्टर वस्तू जळाल्या असल्याचा अंदाज नुकसानग्रस्त व्यावसायिक फिरोज खान मेटकरी व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहेत. विमा कंपन्यांनी त्वरित पंचनामा करून जास्तीतजास्त नुकसान भरपाई द्यावी. बँकांनी कर्जफेडीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त व्यावसायिक अक्षय काळभोर यांनी केली आहे.
00298
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.