पुणे

भाडेकरूमुळे घरमालकाचे भिंग फुटले

CD

थेऊर, ता. २३ : लोणी काळभोरमध्ये भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला दिली नाही म्हणून घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाडेकरूकडे पावणेदोन लाखांचे अमली पदार्थ सापडल्याने त्यास अटक करण्यात आली. मात्र, भाडेकरूच्या करामतीमुळे घरमालकाचे भिंग फुटले आहे.
विमल रामदास काळभोर (वय ६३ रा.कांचन गिरी मठाजवळ,लोणी काळभोर)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकाचे तर अफसर अहेसान अन्सारी (वय ३१, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १ लाख ८० हजार ९२० रुपये किमतीचा ७ ग्रॅम ९९ मिलिग्रॅम (एम.डी.)अमली पदार्थ जप्त केला होता. याप्रकरणातील आरोपी हा काळभोर हाइट्स या विमल रामदास काळभोर यांच्या मालकीच्या इमारतीत भाड्याने राहत होता. त्याच्यासह अन्य १६ भाडेकरू देखील या इमारतीत भाड्याने राहतात, घरमालकाने या १७ भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्याला दिली नाही म्हणून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात गृहखात्याने सावधानतेचा निर्देश दिले आहेत.त्यामध्ये घरमालकांनी आपल्या भाड्याने दिलेल्या जागेत राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती तत्काळ पोलिस ठाण्याला सादर करावी या निर्देशाचा समावेश आहे. त्याला अनुसरून व लोणी काळभोरमध्ये अमली पदार्थ जप्तीच्या कारवाईत सापडलेला अमली पदार्थ बाळगणारा अफसर अन्सारी याच्या तपासाअंती तो विमल काळभोर यांच्याकडे भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आणि भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांचे भिंग फुटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Mahadevrao Mahadik News : आप्पा महाडिकांचा एक कॉल, गोकुळ माजी अध्यक्षांच्या पोराचा जिल्हा परिषदेत 'करेक्ट कार्यक्रम'

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच? 'थोडा संयम बाळगा, मुख्यमंत्रिपद बदलाबाबत योग्यवेळी उत्तर देईन'; DK शिवकुमारांचा कोणावर निशाणा?

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT