उरुळी कांचन, ता. १५ : दुबईमधून भारतात लवकर परत येणार नाहीत, याचा गैरफायदा घेऊन डॉक्टर महिलेची सदनिका बनावट कागदपत्रे तयार करून बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्यात वकिलासह ६ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रेहाना मोहंमद मोबिन शेख (वय ५०, रा. सध्या फ्लॅट नं. ४, बी बिल्डींग, कुमार गॅलेक्सी सोसायटी, ३८२/२ भवानी पेठ, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम शेख (रा. कोंढवा, पुणे), इरफान खादरसाब नदाफ, ॲड. नईम नजीर तांबोळी, सईद नजीर शेख, एक अनोळखी महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी रेहाना शेख या डॉक्टर आहेत. त्या कुटुंबासोबत दुबईत राहतात. त्यांची पुण्यातील भवानी पेठत १२०० चौरस फुटांची सदनिका आहे. त्या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बेंगळुरू येथे असताना त्यांना मोबाइलवर पुणे महानगरपालिकेकडून, ‘डीअर टॅक्स पेअर रिसीव्ह युवर पेमेंट ९८ हजार २३ रुपये अगेन्स्ट F/२/१७/०२७८१०० थँक्यू प्रॉपर्टी टॅक्स पीएमसी’, असा मेसेज आला. परंतु, कामाच्या गडबडीत त्या तो मेसेज विसरून गेल्या होत्या. दरम्यान त्यांना १० ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा पुणे महानगरपालिकेचा मेसेज आला. त्यामध्ये, ‘डीअर टॅक्स पेयर रिसीव्ह युवर पेमेंट ३ हजार ५१० रुपये अगेन्स्ट टायटल ट्रान्स्फर F/२/१७/०२७८१००० थँक्यू प्रॉपर्टी टॅक्स पीएमसी’ असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे त्यांनी या मेसेजच्या बाबतीत त्यांचे वकील हरिष कुंभार यांना चौकशी करायला सांगितली. तेव्हा सर्च रिपोर्टमध्ये या सदनिकेची कदमवाकवस्ती- लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र.६ येथे सन २०२२ पासून १३ नोव्हेंबर २०२५नव्याने नोंदणी झाल्याचे दिसून आले. त्यात वरील सहा जणांनी खोटी कागदपत्रे तयार केली आहेत आणि या बनावट कागदपत्रांच्या आधारे कुलमुख्त्यार पत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) करून घेत संगनमत करून सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी रेहाना शेख यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार सहाही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.