उरुळी कांचन, ता. ७ ः उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मतदान केंद्र क्रमांक दोन युनिक मतदार केंद्र म्हणून हवेली तालुक्यासाठी मतदान केंद्राचा आदर्श ठरेल असे बनवले आहे. या केंद्रात झाडांच्या कुंड्यांनी प्रवेशद्वारावर सजावट केली होती. शिवाय मॅट टाकून पायवाट सुसह्य केली आहे. आतमधील टेबलसुद्धा पर्यावरणपूरक झाडांच्या कुंड्यांनी सजवून मतदान केंद्र सुखद अन् आल्हाददायक वाटेल अशा पद्धतीने सजवले होते.
या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपली वेशभूषा सुद्धा वेगळ्या प्रकारची शेतकरी धाटणीची केली होती. झोनल ऑफिसर मीरा टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचनचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, उरुळी कांचन येथील ड्रीम्स फाउंडेशन संचलित, उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, शैलेश गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने हे मतदान केंद्र नैसर्गिक आणि सांस्कृतिक सजावटीने समृद्ध केले आहे. तसेच या सर्वांच्या प्रयत्नातून मतदान केंद्राच्या बाहेर पर्यावरणपूरक संदेश देणारी सुभाषिते वापरून नैसर्गिक समतोल राखण्याचा प्रयत्न करणारे ३ सेल्फी पॉइंट उत्कृष्ट रांगोळीच्या माध्यमातून सजावट करून तयार केले होते. या ठिकाणी महिला व पुरुष मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्याचा मोह टाळू शकत नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.