पुणे

हवेलीत शांततेत मतदान

CD

उरुळी कांचन,ता. ८ : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकतेने व कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासनाने केलेले काटेकोर नियोजन व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रभावी समन्वयामुळे ही निवडणूक यशस्वी ठरली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. क्षेत्रीय पातळीवर समन्वय राखण्याची जबाबदारी डॉ. अर्चना निकम, तहसीलदार हवेली यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी सेक्टर ऑफिसर, महसूल,पंचायत समिती व इतर विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. निवडणूक व्यवस्थापनासाठी तृप्ती कोलते (अपर तहसीलदार), जयराज देशमुख अप्पर तहसीलदार पिंपरी-चिंचवड, शेखर शेलार (गटविकास अधिकारी), स्वाती नरुटे (नायब तहसीलदार), सचिन चव्हाण साहाय्यक महसूल अधिकारी), नामदेव सोनवणे मंडल अधिकारी फुरसुंगी, चंद्रकला शेळके महसूल सहाय्यक, जयश्री सदगर,महसूल साहाय्यक अंकुश गुरव, सागर तडके ,सुरेंद्र जाधव, साहाय्यक महसूल अधिकारी अप्पर लोणी काळभोर अभिमन्यू करे, महेश वाघमारे, अमोल बराथे व प्रज्ञा खरात ग्राम महसूल अधिकारी, संतोष भिसे संगणक ऑपरेटर यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. मतदान केंद्रांवरील सुविधा, कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक साहित्याचे वितरण, मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच तक्रारींचे तत्काळ निराकरण या सर्व बाबींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष होते. निवडणुकीसंदर्भातील अधिकृत माहिती वेळेत पत्रकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यम अधिकारी योगेश हांडगे यांनी प्रभावीपणे पार पाडले. प्रशासन, पोलिस यंत्रणा, निवडणूक कर्मचारी आणि मतदार यांच्या सहकार्यामुळे हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पूर्णतः यशस्वी पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत; २५० टेबलांवर मतमोजणी, हातकणंगलेत सर्वाधिक २२ फेऱ्या

Pune ZP Results: वारसा विरुद्ध वर्चस्व! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाचा खेळ फसणार, कुणाचं नशीब चमकणार? चुरशीच्या लढाया कोणत्या?

Tax Credit Refund : इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडबाबत दिलासा

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

SCROLL FOR NEXT