पुणे

हवेलीतील ४९ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज

CD

उरुळी कांचन, ता. १० ः हवेली तालुक्यातील सुमारे ४९ ग्रामपंचायतींची मुदत ८ फेब्रुवारी व ९ फेब्रुवारी २०२६ या दोन दिवसात संपलेली आहे. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे पाच वर्षे पूर्ण झाली की, दुसऱ्या दिवसापासून ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत होणार या धोरणाला अनुसरून ८ तारखेला मुदत संपलेल्या २४ ग्रामपंचायतींवर ९ तारखेपासून प्रशासक राज सुरू झाले. तर २५ ग्रामपंचायतींची मुदत ९ तारखेला संपल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर १० तारखेपासून प्रशासकराज सुरू झाले आहे. एकूण ४९ ग्रामपंचायतींवर या दोन दिवसांमध्ये प्रशासक राज सुरू झाले आहे.
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी सहा तारखेला याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार उरुळी कांचन ग्रामपंचायतीवर शिरीष रामचंद्र मोरे विस्तार अधिकारी, पंचायत समिती हवेली यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.अष्टापुर, आंबी, आर्वी, आळंदी म्हातोबा, बकोरी, बहुली, बिवरी, भवरापूर, भावडी, डोणजे, डोंगरगाव, गाऊडदरा, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, घेरा सिंहगड हिंगणगाव, केसनंद, कोरेगाव मूळ, कोंढणपूर, कुंजीरवाडी, खडकवाडी, खेड शिवापूर,लोणी काळभोर या ग्रामपंचायतींची पाच वर्षाची मुदत ८ फेब्रुवारी २०२६ ला संपल्याने त्या ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ पासून प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
थेऊर, मणेरवाडी, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, नायगाव, न्हावी सांडस, पेठ, प्रयागधाम, श्रीरामनगर, शिरसवडी, शिंदवणे, शिंदेवाडी, शिवापूर, सांगरूण, सांगवी सांडस, सोनापूर, सोरतापवाडी, तरडे, तुळापूर, उरुळी कांचन, वढू खुर्द, वरदाडे, वळती, वडकी, आगळंबे या गावांच्या ग्रामपंचायतीची मुदत ९ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली आहे, त्या ठिकाणी १०फेब्रुवारी २०२६पासून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. प्रशासक पदी नियुक्ती झालेल्या व्यक्तीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचे अधिकार व कर्तव्य राहील.
सदर नियुक्ती ज्या दिवशी विधीग्राह्य गठीत झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवसापासून प्रशासकपद व प्रशासकाचे अधिकार संपुष्टात येतील असे आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

T20 WC, IND vs NAM: भारताच्या Playing XI मध्ये होणार दोन मोठे बदल, अभिषेक शर्मासह 'हा' खेळाडूला बेंचवर बसणार?

Khanapur Accident : लग्नाचे कार्य आटोपून गोव्याला परतताना काळाचा घाला; पत्नी जागीच ठार, पती जखमी, पालीतील 'ते' वळण ठरतंय जीवघेणं

भरधाव कार ट्रेलरला धडकून ६ मित्रांचा मृत्यू; वय २३ ते २६ वर्षे, सर्वजण एकाच गावातले

Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

SCROLL FOR NEXT