पुणे

कुरवलीत स्वच्छता, वृक्षसंवर्धनाचा संदेश

CD

उद्धट, ता. २ : कुरवली (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयात दिंडीचे आयोजन केले होते‌. वारकऱ्यांच्या पारंपरिक पोशाखात आठशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हातामध्ये स्वच्छतेचा व झाडे लावून झाडे जगवण्याचा संदेश लिहिलेले फलक घेऊन ही दिंडी विद्यालयामधून गावामध्ये मारुती मंदिराच्या भव्य प्रांगणात पोहोचली. तेथे ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. सरपंच राहुल चव्हाण, उपसरपंच मंदा चव्हाण, अभिजित माने, संतोष कदम, शिवाजी चव्हाण, बापूराव चव्हाण, प्राचार्य गणेश घोरपडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. विविध संत व विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. श्रावणी निंबाळकर, ओम साळुंखे, प्रणव मोहिते, राघव निंबाळकर, आर्यन यादव या विद्यार्थ्यांनी हार्मोनिअम, मृदंग, टाळ वाजवत केलेल्या भजनाने वातावरण भक्तीमय झाले होते. संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी व विठ्ठल रुक्माईची ग्रामस्थांनी पाद्य पूजा केली. विद्यालयाच्या मुली, शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. टाळकरी, पताका घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विठुरायाच्या नाम घोषात पालखी नाचवत छोटेसे रिंगण केले. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीही या सोहळ्यात सहभागी झाले.
यावेळी सचिन दीक्षित, दिनेश यादव, शिवाजी मोरे, बाळासाहेब मोरे, मेहमूद मुलाणी, अभिमन्यू चव्हाण, ज्योती धावणे, भारत काकडे, बापूराव कदम, अंबादास कांबळे, विशाल तुपे, शोभा पोळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT