उद्धट, ता. ५ : गेल्या महिनाभरात केळीचे बाजारभावात मोठी घसरण थांबत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील एक ते दीड महिन्यांपूर्वी केलेला साधारण प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये एवढ्या बाजारभावाने विकली जाणारी केळी आता फक्त ३०० ते ५०० रुपये क्विंटल एवढ्या रुपयांवर आली आहे
केळीचे बाजारभाव इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरल्याने शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत वाढलेली आवक अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प होणे आणि सणासुदीच्या काळात अपेक्षित मागणी नसल्याने बाजारपेठेतील दर कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्व दूर अतिवृष्टीमुळे वाहतूक मार्ग विस्कळित झाले आहेत. अनेक रस्ते बंद असल्याने शेतमाल वेळेत बाजारात आणता येत नाही त्यामुळे बाजारपेठेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक किंवा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतो आहे.
शेतकऱ्यांनी दीड ते दोन लाख रुपये खर्च करून केळी लागवड केली आहे. परंतु एवढे पैसे गुंतवून मिळणारा परतावा मात्र नगण्य आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी खचून गेले आहेत त्यात भर म्हणून व्यापाऱ्यांनी केळी खरेदी करण्यासाठी टाळा टाळ सुरू केली आहे तर वेफर्सवाल्यांनी तर केळी फुकट नेण्यास सुरुवात केली आहे.
नवरात्र आणि दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात नेहमीच फळांची मागणी वाढत असते असा यामागचा अनुभव आहे. परंतु यंदा मात्र हे सगळे उलटे घडले आहे नवरात्रीतही बाजारभाव वाढले नाहीत. उलट जास्तच घसरले. बाजारात आलेल्या मोठ्या आवके समोर मागणी कमी पडली आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकरी निराश व हताश झाला आहे. यावर शासनाने काहीतरी तोडगा काढून शेतकऱ्यांना वाचवावे
-धर्मेश थोरात, प्रगतशील शेतकरी
00508
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.