पुणे

केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ

CD

उद्धट, ता. १ : बाजारभाव घसरल्याने मागील काही दिवसांत केळीला दोन ते तीन रुपये प्रतिकिलो एवढा कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे इंदापुरातील उत्पादकांना केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
काही तथाकथित व्यापारी सरकारची दिशाभूल करत केळीचा बाजारभाव सात रुपये प्रतिकिलो असा दाखवत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना तो मिळत नाही. शेतकऱ्यांच्या पदरी केवळ प्रतिकिलोस दोन ते तीन रुपये मिळत आहेत. केळीचे घड शेतामध्येच झाडाला पिकत असल्याचे विदारक चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
ऑगस्ट महिन्यात केळीला प्रतिकिलो १८ रुपये मिळत होते. तेच आत्ता दोन ते तीन रुपयापर्यंत खाली आले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या प्रतिच्या मालाला देखील योग्य भाव मिळत नसल्याने व अवकाळी पावसामुळे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. यावर सरकारचे मात्र अजिबात लक्ष नाही, यामुळे शेतकऱ्यांना नाराजी पसरली आहे.
उलट शेतकऱ्याकडून दोन ते तीन रुपये केळी खरेदी करून शेवट उपभोक्त्याला मात्र ३० टे ५० रुपये प्रतिडझन या चढ्या दराने केळी खरेदी करावी लागत आहे. शासनाला या व्यापाऱ्यांकडे लक्ष द्यायला मात्र वेळ नाही.

00546

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: ''26 तारखेला मी आणि दादा देवगिरीवर होतो, ते म्हणालेले...'' राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन छगन भुजबळ यांचं मोठं विधान

Crime: मद्यधुंद टोळक्यानं चिमुकलीवर वाकडी नजर टाकली; पित्यानं जाब विचारला नंतर... जे घडलं त्यानं डोंबिवली हादरलं

Mumbai Missing Minors Fact : मुंबईत ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले खरंच बेपत्ता ? मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण, नेमकं काय सांगितले?

Numerology News: मूलांक 2 चे लोक या 4 क्षेत्रांमध्ये चमकवतात आपले भाग्य; लवकर मिळवतात नाव आणि प्रतिष्ठा!

Latest Marathi News Live Update: म्हाडा मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर १२० सदनिकांची विक्री

SCROLL FOR NEXT