पुणे

अपंगत्वावर मात करीत आत्मनिर्भर

CD

अभिजीत देशपांडे
उद्धट, ता. २ : पवारवाडी (ता. इंदापूर) येथील ओंकार सत्यवान गोडसे यांना जन्मजात अस्थिव्यंग आजार आहे. या आजाराचा कोणताही बाऊ न करता त्यांनी स्वतः आत्मनिर्भर पर्यंत स्वतःचे ई सेवा केंद्र सुरू केले त्याचबरोबर पंचक्रोशीतील युवकांचे ते ऊर्जा स्थान बनले आहेत.
ओंकार यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी खूप हाल अपेष्टा कराव्या लागल्या. चालता येत नसल्याने आई-वडिलांनी दररोज शिकण्यासाठी खांद्यावरती बसून शाळेत सोडावे व आणावे लागत होते; परंतु निश्चय आणि शिक्षणाची आवड असल्याने या अडचणींवर देखील मात केली. त्यानंतर चौथीनंतरची शिक्षण घेण्यासाठी गावाच्या बाहेर पडावे लागले कारण या पद्धतीच्या दिव्यांग मुलांना हायस्कूलमध्ये कोणी घेत नव्हते त्यानंतर पुण्यामध्ये दिव्यांग शाळा येथे हायस्कूल शिक्षण पूर्ण झाले तसेच तेथे व्यंगाचा उपचार देखील थोड्याफार प्रमाणात झाला व ते आपल्या पायावरती उभे राहून चालू लागले हेच खूप मोठे यश असे म्हणावे लागेल. या पाच वर्षांमध्ये ओंकार यांच्या आजीचे खूप मोठे योगदान आहे, त्या पाच वर्षे या संस्थेत निवासी राहिल्या. यानंतर पुढील बीकॉम पर्यंतचे शिक्षण तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती येथे पूर्ण झाले या कॉलेजमध्ये शिक्षकांनी वरती असणारे क्लास ओंकार यांच्यासाठी खालच्या मजल्यावर घेत असत. कसेतरी शिक्षण पुरे झाले; परंतु आता एक मोठा पेज प्रसंग होता रोजगाराचा. बारामती येथील एमआयडीसीमध्ये नोकरी शोधण्यास सुरुवात केली; परंतु दिव्यांग लोक काहीच कामाचे नसतात असा बऱ्याच आस्थापनांचे मते होते. त्यानंतर पुण्यातील एका आयटी कंपनीने ओंकार यांना काम लावले; परंतु त्यांनी दिव्यांगत्वाचा विचार न करता काही कामे लावली त्यातून खूप मनस्ताप होऊ लागगल्याने त्यांनी नोकरी सोडून घर गाठले.


टर्निंग पॉईंट
पुढे काहीतरी करावे या उद्देशाने ओंकार हे संगणकाचे ज्ञान घेत राहिले. सणसर येथील ही सेवा केंद्रामध्ये प्रवीण शिंदे व अजिंक्य शिंदे यांच्याशी ओळख झाली व त्यांनी ओंकार यांना त्यांच्या सेवा केंद्रामध्ये काम दिले. थोड्या दिवसात ते काम पूर्ण अवगत करून ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर ओंकार यांच्या आई-वडिलांनी २०२२मध्ये उदमायवाडी येथे ई सेवा केंद्र सुरू करून दिले त्याद्वारे ते गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना व गरजूंना चांगल्या पद्धतीने सेवा देऊन सरकारी योजना त्यांपर्यंत पोचवून त्या लाभ मिळवून देण्यास मदत करत आहेत. या सेवा केंद्राद्वारे ओंकार स्वतः आत्मनिर्भर बनले व समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.


0586

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT