पुणे

वीज वाहिनीच्या खांबाला उंडवडी येथे वेलीचा वेढा

CD

उंडवडी, ता. २३ : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) हद्दीत सोनवडी सुपेच्या वीज रोहित्रांना वीज पुरवठा करणाऱ्या उच्च वाहिनीच्या खांबाला काविळीच्या वेलीने जमिनीपासून तारांपर्यंत वेढले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.
सोनवडी- उंडवडी कडेपठार रस्त्यावर या दोन गावांच्या शिवेवरील पाझर तलावानजीक विजेच्या मुख्य व उच्च दाब वाहिनी गेल्या आहेत. मात्र, या विजेच्या वाहिन्यांचे खांब तलावाच्या पाण्यातून गेले आहेत. या खांबाला काविळीच्या वेलांनी वेढा टाकला आहे. विशेष म्हणजे, येथील तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. या पाण्याजवळील खांबावर काविळीचा वेल विजेच्या तारांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे वीजेचा प्रवाह पाण्यात उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने तातडीने या खांबावरील वेल काढावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shai Hulud : सरकारचा अलर्ट! आला असा व्हायरस जो भारताची डिजिटल सिस्टम करू शकतो उद्ध्वस्त; तुमच्यावरही होणार परिणाम, पण कसा? जाणून घ्या

Narendra Modi: 'या' मुद्द्यावर मोदी-ट्रम्प आले एकत्र; जगभरातील सर्व देशांना केलं आवाहन

Latest Marathi News Live Update : दिवाळीला फराळ खायचा की चिखल? पूरबाधित शेतकऱ्यांचा सवाल

Sugarcane Crisis : अतिवृष्टीमुळे साखर हंगामावर ‘आपत्ती, मंत्री समितीच्या बैठकीत काय होणार निर्णय

Latur Earthquake : गेल्या 27 वर्षांत भूकंपाचे 89 धक्के; लातूरकर भीतीच्या सावटाखाली, विज्ञानविषयक संस्थांचे संशोधनाकडे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT