पुणे

अज्ञात वाहनाच्या धडकेत उंडवडीत हरणाचा मृत्यू

CD

उंडवडी, ता. २३ : अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर जराडवाडी (ता. बारामती) येथे सोमवारी (ता. २३) सकाळी सातच्या दरम्यान घडली.
या घटनेनंतर वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना उंडवडी सुपेच्या टोल नाक्यापासून ३०० ते ४०० मीटरवर घडली. घटनेत मरण पावलेले हरिण अंदाजे ५ ते ६ वर्ष वयाचे असावे, असा वनविभागाचा अंदाज आहे.
या भागातील जराडवाडी, उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे या गावांच्या हद्दीत वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या वनक्षेत्रात चिंकाराची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. चिंकारा अन्न व पाण्याच्या शोधार्थ, तसेच कळपातून चुकल्यानंतर महामार्गावर येत आहे. आजही त्याच पद्धतीने चिंकारा महामार्गावर आल्याने त्याला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहन निघून गेले. ही घटना रस्त्याने ये- जा करणाऱ्या ग्रामस्थांनी वनविभागाला कळविली. त्यानंतर घटनास्थळावर वनकर्मचारी दिलीप काळे व शुभम जराड दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृत चिंकारा शवविच्छेदन करण्यासाठी पशुसंवर्धनाच्या दवाखान्यात नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोण? देशात ३५वी रँक मिळवत UPSCमध्ये यश

Navmi Havan 2025: नवमीला हवन करणे का गरजेचं आहे? जाणून घ्या सामग्री, विधी, मंत्र अन् मुहूर्त एकाच क्लिकवर

Women World Cup 2025: ४७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार? महिलांचा एकदिवसीय विश्‍वकरंडक आजपासून; भारत-श्रीलंका सलामीची लढत

Jammu Kashmir Tourism: पर्यटकांसाठी खुशखबर! आता जम्मू- काश्मीरमधील ७ प्रसिद्ध स्थळे पुन्हा सुरु, जाणून घ्या कोणती?

Mumbai News: धारावीचा पुनर्विकास मुंबईसाठी डबल धोक्याचा, वाहतूक कोंडी अन् पुराचा फटका बसण्याची भीती

SCROLL FOR NEXT