पुणे

खोमणे दांपत्याच्या केळीचा गोडवा पोचला इराणच्या बाजारपेठेत

CD

उंडवडी, ता. १९ : माळरान जमिनीवर शेती म्हणजे कष्ट, खर्च आणि अनिश्चितता अशी सर्वसाधारण धारणा असते. पण जळगाव सुपे (ता. बारामती) येथील मच्छिंद्र गोपीनाथ खोमणे आणि त्यांची पत्नी संगीता या दांपत्याने ती धारणा मोडीत काढली. चिकाटी, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचा अभ्यास यांच्या बळावर त्यांनी माळरानाला सोन्यासारखं उजळून टाकलं आहे. केवळ १६ गुंठ्यांत फुलविलेल्या बागेतील केळी थेट इराणच्या बाजारपेठेत पोचली आहेत.

खोमणे यांना केळीच्या पहिल्याच तोडणीत ३७५ झाडांतून १०,३५८ किलोचे उत्पादन मिळाले आणि सुमारे २ लाख ५८ हजार ९५० रुपयांचे उत्पन्न मिळाले. उरलेल्या १२५ झाडांतून अजून ८५ हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. खोमणे कुटुंबाकडे साडेपाच एकर माळरानावर शेती करणाऱ्या दोन विहिरी आणि एक बोअरवेल आहे. त्यांनी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी जी-९ जातीच्या केळीची लागवड केली. फक्त १६ गुंठे क्षेत्रावर ५२० रोपे प्रत्येकी १५ रुपयांना घेतली. ‘ठिबक’ सिंचन, शेणखत, विद्राव्य खते, मशागत बांधणी, आधार दोर, अशा बारकाव्यांवर त्यांनी काटेकोर लक्ष दिले.
खोमणे यांच्या यशामागे शेतकरी लक्ष्मण जगताप, तसेच रानडे कंपनीचे शुभम पठारे आणि जय बायोटेकचे रणवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रमाचे मिळाले सुवर्णफळ
अर्ध्या एकरातील एकूण खर्च सुमारे ६० हजार रुपये झाला. मात्र “सर्व कामे स्वतःच्या हाताने” हे धोरण स्वीकारल्याने मजुरीत बचत झाली आणि पिकाशी घट्ट नाते जडले.
शेतातील प्रत्येक घामाचा थेंब त्यांनी स्वप्नासारखा जपला. केळीची झाडे वाढत असताना संगीता खोमणे यांनी त्या झाडांची जणू मुलांसारखी काळजी घेतली. त्यांच्या या श्रमाचे सुवर्णफळ मिळाले आहे. व्यापाऱ्याने २५ रुपये किलो दराने बागेतच खरेदी केली.

सुमारे तीन लाखांचा मिळणार निव्वळ नफा
पहिल्याच हंगामात खोमणे दांपत्याला एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, खर्च वजा करता निव्वळ नफा २ लाख ८२ हजार रुपये राहील. पुढे ‘घड’ काढलेली झाडं तोडून नवीन फुटवे पकडले जातात आणि असे तीन हंगामांपर्यंत चांगले उत्पादन मिळत राहते.


03077

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT