उंडवडी, ता. १८ : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील बारामती कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिक उपक्रम विभागाच्या वतीने दिव्यांग मुलांसोबत उपक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी बारामती येथील डॉ. अनिल मोकाशे यांच्या बालकल्याण सेवा केंद्राला भेट दिली.
या भेटीदरम्यान स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू, फळांचे वाटप केले. कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मोकाशे यांनी विद्यार्थ्यांना औषधशास्त्र व विषविज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी समाधान व्यक्त करून समन्वयक व विभागप्रमुखांच्या परिश्रमाचे कौतुक केले. प्रा. मयूर सोनार यांनी आभार मानले. यावेळी प्रा. अश्विनी ढोले, प्रा. नीता शिंगाडे आदी उपस्थित होते.