पुणे

बारामती कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील ‘सॅनोफी’ला शैक्षणिक भेट

CD

उंडवडी, ता. ५ : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील डेलोनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसीच्या फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत सॅनोफी फार्मास्युटिकल, गोवा येथे शैक्षणिक व औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते.
या भेटीदरम्यान सॅनोफी फार्मास्युटिकल येथील व्यवस्थापक नितीन गहूकर व मनोज खाडे यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण विभाग (QC), सुरक्षा नियम, अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच जागतिक दर्जाची औषधनिर्माण मानके (GMP) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उत्पादन प्रक्रियेचे प्रत्यक्ष दर्शन घेताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत विविध विभागांबाबत प्रश्न विचारून अधिक माहिती जाणून घेतली.

औद्योगिक भेटीत महाविद्यालयातील प्राध्यापकवर्गासह प्रा. एस. व्ही. शिंपळे व प्रा. विकेश कुकडे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना औद्योगिक शिस्त, कार्यपद्धती तसेच उद्योगातील व्यावसायिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना उद्योगाशी जोडणारे उपक्रम संस्थेच्या गुणवत्तावृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून भविष्यातही अशा शैक्षणिक व औद्योगिक भेटी नियमितपणे आयोजित करण्यात येतील.

दरम्यान, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. श्रीकृष्ण बावकर यांनी सांगितले की, औद्योगिक भेटींमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमासोबतच प्रत्यक्ष उद्योगातील कार्यपद्धती, गुणवत्ता व्यवस्थापन व करिअरच्या संधी यांचे वास्तव चित्र समजते.

03172

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जीआर आला! लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; आता 'अशी' चूक पुन्हा करु नका

"ते माझ्या पाठीवरून हात फिरवायचे.." मराठी अभिनेत्रीला सिनियर कलाकाराचा चुकीचा स्पर्श ; "मी मोठ्याने बोलले.."

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदच्या 73 जागांसाठी उद्या मतदान

Malaysia Job Portal: विदेशात नोकरीची सुवर्णसंधी! जॉब पोर्टल लाँच झाल्याने मलेशियात एजंटशिवाय मिळणार जॉब

Pashan News : पीएमपीच्या थांब्याअभावी प्रवाशांचे हाल; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT