पुणे

नायगावात वहिवाटीच्या रस्त्यावर अडवणूक

CD

उरुळी कांचन, ता. १६ : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या दोन्ही बाजूच्या भिंतीच्या कुंपणाचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना १०० वर्षांपासूच्या वहिवाटीचा रस्ता बंद होत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी कोर्टात धाव घेतील. कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू समजून घेत कामावर स्थगिती आणली आहे. तसेच याबाबत महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्लॉटिंग क्षेत्र करून संस्थेची हद्द निश्चितीसाठी भिंतीच्या कुंपनाचे काम चालू केले आहे. प्लॉटिंग क्षेत्राशेजारी कोद्रे फार्मकडे जाणारा रस्ता अंदाजे २६७ मीटरचा आहे. हा रस्ता सर्व शेतकऱ्यांना सोईचा असून पूर्वीपासून या रस्त्याचा वापर येथील शेतकरी करत आहेत. सदर रस्त्याची वहिवाट ही १०० वर्षांच्या अधिक काळापासून आहे. हा रस्ता शासकीय गायरान नायगावच्या हद्दीतून जात आहे. मात्र, संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हाच रस्ता बंद करून तेथे भिंतीच्या कुंपनाचे काम सुरु केल्याने येथील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विनंती केली, मात्र, त्यावर अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांना ४ किलोमीटरचा पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला.

संस्थेच्या संबंधित अधिकारी सातत्याने काणाडोळा करत असल्याने शेतकऱ्यांना शेवटी कोर्टाची पायरी चढावी लागली. कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू समजून घेत भिंतीच्या कंपाउंडच्या कामावर स्थगिती आणली आहे. परंतु, संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी भिंतीच्या कंपाउंडने रस्ता बंद केल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, नायगाव गावातील तब्बल १०० ते १५० शेतकऱ्यांचे शेत हे गावापासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान पाच मिनिटांचा २६७ मीटरचा रस्ता हा ४ किलोमीटरचा झाला तर शेतकऱ्यांना पूर्ण गावाला वळसा घालून शेतात पोचावे लागले.


कोर्टाकडून स्थगिती ...
नायगाव ग्रामस्थांच्या वतीने दाखल केलेल्या दाव्यामध्ये इज मेंट एक प्रमाणे सदर दावा दाखल केला असून प्रतिवादी संस्था १९७७ सालापासून ९९ वर्षाच्या कराराने ही जमीन सुमारे १०७ हेक्टर भाडेतत्त्वावर ऊस संशोधनासाठी घेतली आहे. सदर संस्था त्या क्षेत्रात येण्या पूर्वीपासून वर्षानुवर्षे वादी व इतर शेतकरी वहिवाटीचा रस्ता वापरत होते. हे प्रकरण वकील संग्राम कोल्हटकर व माधुरी पाटोळे हे प्रकरण कोर्टामध्ये लढत आहेत.

शंभर वर्षापासून वहिवाटीचा असणारा रस्ता बळजबरीने बंद करण्याचे काम व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे संबंधित अधिकारी बेकायदेशीरपणे करत आहेत. न्यायालयाने रस्ता बंद करू नये म्हणून जैसे थे आदेश देऊन सदर रस्त्याचे काम बंद केले आहे. शेतकऱ्यांच्या वतीने मी इशारा करतो की हा रस्ता बंद केल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करणार आहेत.
- जितेंद्र चौधरी, शेतकरी, नायगाव (ता. हवेली)

03111

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

SCROLL FOR NEXT